आलमट्टी डाव्या कालव्यात मुलगा बुडाला
12:23 PM Oct 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वार्ताहर/विजापूर
Advertisement
आलमट्टी डाव्या कालव्यात अंघोळीसाठी गेलेला मुलगा पाण्यात बुडाल्याची घटना सोमवारी घडली. आलमट्टी-मुळवाड जोडरस्त्याजवळील क्रॉसजवळ असलेल्या बेकरी दुकानात काम करणारा रवी जग्गल (वय 15) हा मुलगा दिवाळी अमावस्येनिमित्त कपडे धुऊन स्नानासाठी पाण्यात उतरला होता. मात्र, कालव्यातील जोरदार प्रवाहामुळे तो बुडाल्याची माहिती समोर आली आहे. त्याला पोहता येत नसतानाही पाण्यात उतरल्याचे समजते. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस, अग्निशमन दल व अनुभवी पोहणारे शोधकार्य करत आहेत.
Advertisement
Advertisement