For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

300 किलो वजनाची व्होडका बॉटल

06:28 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
300 किलो वजनाची व्होडका बॉटल
Advertisement

उचलण्यासाठी मागवावा लागतो जेसीबी

Advertisement

मद्यसेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे, तरीही मद्यपान करणारे अनेक लोक जगात भेटतात. अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या मद्याच्या बाटल्या जमविण्याचा छंद असतो. एक अशीच अनोखी व्होडकाची बॉटल सध्या विकली जात आहे. ही जगातील सर्वात मोठी व्होडका बॉटल असून याची वजन अधिक असल्याने ती उचलण्यासाठी जेसीबीच मागवावा लागतो. तर याच्या किमतीत पूर्ण घर खरेदी केले जाऊ शकते.

ब्रिटनचा मद्य ब्रँड एयू व्होडकाने एक अनोखा विश्वविक्रम नोंदविला आहे. या कंपनीने जगातील सर्वात मोठी व्होडका बॉटल तयार केली आहे. पीरियॉडिक टेबलमध्ये गोल्डचा सिम्बॉल एयू आहे, त्याच नावावर या व्होडका ब्रँडला हे नाव प्राप्त झाले आहे. व्होडकाची ही बॉटल लंडनच्या स्टँस्टेड विमानतळावर ठेवण्यात आली असून 24 जूनपर्यंत ती तेथे असणार आहे. ही बॉटल विकण्यासाठी उपलब्ध असली तरीही तिला खरेदीदार मिळणे सोपे नाही.

Advertisement

या गोल्डन बॉटलची लांबी 2.1 मीटर आहे. यात सुमारे 250 लिटर व्होडका असून त्याद्वारे 1500 जणांना मद्यपान करता येणार आहे. बॉटलचे वजन 300 किलो आहे. या बॉटलची किंमत सुमारे 1.5 कोटी रुपये आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डकडून ही बॉटल निर्माण करण्यासाठी अवलंबिलेले इंजिनियरिंग अणि प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे म्हटले गेले आहे. यापूर्वी पोलंडचा व्होडका ब्रँड चॉपिनने तयार पेलेली बॉटल विश्वविक्रमी ठरली होती. ती बॉटल 200 लिटरपर्यंत व्होडका साठवून होती.

एयू व्होडकानुसार दरदिनी या बॉटलमधून व्होडकाचा एक शॉट पुढील 28 दिवसांपर्यंत घेतला तरीही यातील व्होडका संपणार नाही. एका सर्वसाधारण व्यक्तीला नशेत आणण्यासाठी 4 व्होडका शॉट्सची गरज असते. अमेरिकन शॉट्स 44 एमएलचे असतात. त्या हिशेबानुसार या बॉटलमधून सुमारे 1500 जणांना व्होडका सर्व्ह करता येणार आहे. सध्या ही बॉटल केवळ डिस्प्लेसाठी असून जूनमध्ये ती येथून हटविण्यात आल्यावर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Advertisement
Tags :

.