For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोघे जुळे भाऊ...बनले राष्ट्रीय जलतरणपटू आणि आता झाले राजपत्रित अधिकारी

06:00 AM Oct 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
दोघे जुळे भाऊ   बनले राष्ट्रीय जलतरणपटू आणि आता झाले राजपत्रित अधिकारी
Advertisement

कोल्हापुरातील राजवर्धन व हर्षवर्धन नाईकची अनुकरणीय यशोगाथा, दोघांना अधिकारी बनवण्यात बहिण ऐश्वर्या डुबल यांचा मोठा वाटा

Advertisement

संग्राम काटकर/कोल्हापूर 

हे दोघे जुळे भाऊ आहेत. एकाचे नाव राजवर्धन नाईक व दुसऱ्याचे नाव हर्षवर्धन नाईक (मुळगाव हळदी, ता. करवीर, सध्या रा. रंकाळा टॉवर परिसर पाणारी मळा). राजवर्धन हा हर्षवर्धनपेक्षा केवळ नऊ मिनिटांनी मोठा आहे. या दोघांनी शालेय जीवनापासून जलतरणातील स्थानिक ते राष्ट्रीय स्पर्धांमध्ये केलेल्या कामगिरीत कमालीचे साधार्म्य आहे. असेच साधार्म्य त्यांच्या राजपत्रित अधिकारी होण्यातही आहे. दोघांनीही अधिकारी होण्याची महत्वकांक्षा उराशी बाळगून 2022 साली केलेल्या अथक अभ्यासाच्या जोरावर एमपीएससीची परीक्षा दिली. गेल्याच महिन्यात मुख्य परीक्षेचा निकाल लागला. त्यात सुदैवाने राजवर्धन व हर्षवर्धन हे दोघेही पास होऊन राजपत्रित अधिकारी होण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. आता लवकरच हे दोघेही अधिकारी पदाचे ट्रेनिंग घेऊन सेवेत रुजू होतील. राजवर्धन व हर्षवर्धनच्या नशिबात एकाच वेळी अधिकारी होण्याचा योग असला तरी त्यांनीही नशिबाला अथक कष्टाने दिलेल्या जोडीला नजरअंदाज करता येणार नाही.

Advertisement

हळदीतील (ता. करवीर, जि. कोल्हापूर) सामान्य कुटुंबात जन्मलेल्या राजवर्धन व हर्षवर्धन यांचे वडील जयसिंग नाईक हे त्यांच्या तरुण वयात अॅथलिट होते. ते सध्या वेंगुला (सिंधुदूर्ग) खर्डेकर कॉलेजमध्ये क्रिडाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपल्याप्रमाणे आपल्या मुलांनीही एखाद्या खेळात असावे अशी त्यांची भावना होती. आई नीता नाईक ह्या राजवर्धन व हर्षवर्धन यांनी चांगले शिक्षण घेऊन भावी जीवनाला स्थिरता येईल असे काहीतरी करावे या मताच्या होत्या. राजवर्धन व हर्षवर्धनला ऐश्वर्या नामक एक मोठी बहीण आहे. त्या सध्या सातारामध्ये मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या जुळ्या भावांकडून रोजच्या रोज शाळेचा अभ्यास करुन घेण्याची जबाबदारीच स्वीकारली होती. त्यामुळे घरामध्ये खेळ आणि अभ्यास याची सांगड जुळेल असे वातावरण तयार झाले. राजवर्धन व हर्षवर्धन हे दोघे टेन्शन फ्री होऊन गेले. त्यांनी इतर सामान्य मुलांप्रमाणेच हळदीतील विद्यामंदिरात प्राथमिक शिक्षण सुऊ केले. यावेळी त्यांच्या घरची परिस्थिती अगदीच बेताची होती. सातवीमध्ये शिकत असताना लहानग्या राजवर्धन व हर्षवर्धन या दोघांनी आवडीनुसार पिराजीराव सरनाईक ट्रस्टच्या भवानी जलतरण तलावात जलतरणाचा सराव सुरु केला. सरावावरील खर्चासाठी वडीलांनी उसनवारीतून पैसे उभा करतानाच दोघांना जलतरण तलावाकडे नेण्याची आणि तेथून घरी आणण्याची जबाबदारी स्वीकारली. वडील, आई व बहिणीची तळमळीला जागत राजवर्धन व हर्षवर्धनने अधिकारी बनत घराला खऱ्या अर्थाने घरपण आणले आहे. असे असले तरी जलतरणाचा सराव सुऊ करतेवळी दोघांनी ही आपण भावी काळात राजपत्रित अधिकारी होऊ असा विचारही मनात आणला नव्हता. जलतरणातही आपली मोठी कामगिरी होईल असेही त्यांना कधी वाटले नाही. परंतु फळाची अपेक्षा न करता कर्म करत जा याप्रमाणे दोघांनीही सतत जलतरणाचा सराव करत आपण स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व करू शकू इतके लायक स्वत:ला बनवले. जसजसे दिवस, महिने आणि वर्षे पुढे सरकू लागले तसे राजवर्धन हा 50, 100 व 200 मीटर फ्रीस्टाईल व बॅकस्ट्रोक या जलतरणातील प्रकारात चांगला जलतरणपटू बनला. भावी काळातील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे ठरवून तो सरावात स्वत:ला झोकून देऊ लागला. हर्षवर्धननेही 50, 200 व 200 ब्रेस्टस्ट्रोक आणि फ्रीस्टाईल या प्रकारातून स्पर्धेत सहभागी होण्याचे पक्के करून सरावाचा श्रीगणेशा सुरू केला. आई-वडिलांचीही त्यांना मोठी साथ मिळू लागली. दोघांनीही रोजच्या रोज केलेल्या सरावातून वेगाने पोहण्याची क्षमता अंगात निर्माण केली. सोबत बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक व फ्रिस्टाईल या प्रकाराचे नियोजित आंतर कमीत कमी वेळेत गाठण्याचे कौशल्य दोघांमध्येही निर्माण झाले. कोण किती वेळात 50, 100 व 200 मीटरचे आंतर गाठतोय याची तर त्यांच्यामध्ये जणू रोजच स्पर्धा रंगायची. या स्पर्धेने त्यांच्यात पदके जिंकण्याचे धमक आली. आई नीता नाईक यांनी राजवर्धन व हर्षवर्धन यांच्या डायटची पूर्णपणे काळजी घेतली होती. या डाएटने दोघांनाही मायेची ऊर्जा दिली.

राजवर्धनची मोठी भरारी...

राजवर्धनने 20 हून अधिक शालेय व फेडरेशनच्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत प्रतिनिधीत्व केले. 50, 100 व 200 मीटर फ्रीस्टाईल व बॅकस्ट्रोक या प्रकारात अन्य स्पर्धकांना भारी पडत त्याने 10 सुवर्ण व 13 रौप्य पदकांची कमाई करून राज्यात आव्हान निर्माण केले. शाळेचा दैनंदिन अभ्यास करत करत सहा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व कऊन राष्ट्रीय जलतरणपटू अशी आपली प्रतिमा तयार केली. 2018 साली गुजरात व दिल्लीमध्ये झालेल्या विविध राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत राजवर्धनने केलेली कामगिरी प्रशंसनीय ठरली. स्पर्धेतील बॅकस्टोक व फ्रीस्टाईल या प्रकारात 1 सुवर्ण, 3 रौप्य व 4 कांस्यपदकांची कमाई केली. गुजरातमधील स्पर्धेत मिळवलेल्या सुवर्णपदकामुळे राजवर्धनची ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या वर्ल्ड स्कूल गेम्स-जलतरण स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. या स्पर्धेत त्याने 100 व 200 मीटर बॅकस्ट्रोक या प्रकारातून प्रतिनिधित्व केले. 2020 साली गुवाहाटी (आसाम) येथे खेलो इंडियाअंतर्गत झालेल्या जलतरण स्पर्धेत 4 बाय 100 मीटर फ्रिस्टाईल रिले या प्रकारात राजवर्धनने महाराष्ट्र संघाला सांघिक रौप्य पदक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. ओडिसा, जालंदर (पंजाब) आणि बेंगळूर येथील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत तर राजवर्धनने चपळदार कामगिरी करत 50, 100 व 200 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य पदक पटकावत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे नाव देश पातळीवर गाजवले.

हर्षवर्धनचीही जलतरणात दमदार कामगिरी...

राजवर्धनच्या पावलांवर पाऊल टाकत हर्षवर्धननेही स्थानिकपासून राष्ट्रीय स्पर्धांपर्यंत मजल मारत पदकांची कमाई केली आहे. त्यानेही 20 राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करत 12 सुवर्ण 10 रौप्य आणि 5 कांस्य पदके आपल्या खात्यात जमा केली आहेत. ही कामगिरी जलतरणाच्या 50, 100 व 200 मीटर ब्रेस्टस्ट्रोक व फ्रीस्टाईल या प्रकारातील झाली आहे. हर्षवर्धनने राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये जशी वेगवान कामगिरी केली आहे अगदी तशीच कामगिरी राष्ट्रीय स्पर्धांमध्येसुद्धा केलेली आहे. स्पर्धेच्या निमित्ताने जलतरण तलावात उडी घेतली की पदक आपल्या नावावर करणारच असा हर्षवर्धनचा दबदबा होता. प्रशिक्षकांनी दिलेल्या शिकवण आणि त्यातून आपल्यात निर्माण झालेल्या कौशल्याच्या जोरावर हर्षवर्धनने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत तब्बल 8 रौप्य व 7 कांस्य पदके जिंकली. हर्षवर्धनला प्रतिष्ठेच्या खेलो इंडियाअंतर्गत 2020 साली झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या संधीचं सोनं करत त्याने 4 बाय 100 मीटर फिस्टाईल रिले प्रकारात रौप्य पदक जिंकले.

कोरोना काळात राजवर्धन, हर्षवर्धनला अधिकारी होण्याची मिळाली संधी...

जलतरण स्पर्धांमधून मिळवलेल्या पदकांची ऊर्जा घेऊन राजवर्धन व हर्षवर्धनने  एमपीएससीची परीक्षा देण्याचा निर्धार केला. 2020 साली त्यांनी परीक्षेचा अभ्यास करायला सुऊवात केली असताना देशात कोरोनाचे संकट आले. संकट वाढू नये म्हणून त्यावेळी शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणच्या लायब्ररीसुद्धा बंद ठेवल्या होत्या. अशा परिस्थितीत सध्या सातारा येथे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असलेली सख्खी बहीण ऐश्वर्या डुबल व त्यांचे पती मंत्रालय कक्ष अधिकारी संग्राम डुबल यांनी दोघांच्या एमपीएससीच्या अभ्यासाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी दोघांकडून घरीच परीक्षेचा पुस्तकी आणि ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करवून घेतला. त्यांनीही रोज पाच ते सहा तास अभ्यास केला. त्याच्या जोरावर दोघांनीही 2022 साली एमपीएससीने घेतलेली पूर्व परीक्षा दिली. या परिक्षेत दोघांनीही चांगले गुण मिळवत 2023 साली झालेल्या मुख्य परिक्षेसाठीची आपली पात्रता सिद्ध केली. मुख्य परिक्षेतही दोघांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत राजपत्रित अधिकारी बनवण्याचा निर्धार साकार केला. राजवर्धनची उपशिक्षण अधिकारी या पदासाठी व हर्षवर्धनची सहायक प्रकल्प अधिकारी पदासाठी शासनाने नियुक्ती केली. आता हे दोघे अधिकारी पदाचे प्रशिक्षण घेऊन ऊजु होणार आहेत.

दोघांनाही चांगले गुऊ लाभले...

आम्ही दोघांनी शालेय शिक्षण महाराष्ट्र हायस्कूलमधून तर महाविद्यालयीन शिक्षण गोखले कॉलेजमधून पूर्ण केले. या शिक्षणाच्या कालावधीत आम्हाला ज्येष्ठ जलतरण प्रशिक्षक श्रीकांत जांभळे व बेंगळूरचे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते निहार आमिन यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यांनी आमच्याकडून जलतरण स्पर्धेत पदके मिळवण्यालायक तयारी करवून घेतली. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही राष्ट्रीय जलतरणपटू बनलो हे विसऊ शकत नाही, असे राजवर्धन व हर्षवर्धन नाईक यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.