मिनी ऑलिम्पिक खो-खो स्पर्धेत बेळगावचे दोन्ही संघ अंतिम फेरीत
बेळगाव : मंगळूर येथे कर्नाटक राज्य ऑलिम्पिक खो खो स्पर्धेत बेळगावच्या मुला, मुलींच्या संघाने उपांत्य फेरीत मुलींच्या संघाने रायचूरचा तर मुलांच्या सामन्यात धारवाड संघाचा पराभव करुन दोन्ही संघांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. मंगळूर येथे सुरू असलेल्या मिनी ऑलिम्पिक खो खो स्पर्धेत मुलांच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बेळगाव संघाने धारवाड संघाचा 2 गडी राखून विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात रोहीत, दक्ष, किशोर व यश यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत संघाला अंतिम फेरीत नेण्याचा सिंहाचा वाटा होता. मुलींच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बेळगावने रायचूरचा एकतर्फी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात संध्या, स्नेहा, निकीता, वैष्णवी यांनी उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवून संघाला अंतिम फेरीत नेले. मुलांचा अंतिम सामना बागलकोट संघाशी तर मुलींचा अंतिम सामना म्हैसूर संघाशी होणार आहे. या दोन्ही संघांना खो-खो प्रशिक्षक एन. आर. पाटील, अशोक बुद्धी, श्रीधर बेन्नाळकर, प्रदीप भांदुर्गे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.