बुद्धिबळ विश्वचषकातील दोन्ही उपांत्य लढती टायब्रेकरमध्ये
वृत्तसंस्था/ पणजी
बुद्धिबळ विश्वचषकात शनिवारी येथे ग्रँडमास्टर नोदिरबेक याकुबबोएव्ह आणि ग्रँडमास्टर जावोखिर सिंदारोव्ह यांनी आणखी एक सामना बरोबरीत सोडविला, तर ग्रँडमास्टर आंद्रे एसिपेन्कोला चिनी ग्रँडमास्टर वेई येईच्या बचावफळीला भेदता आले नाही. यामुळे विश्वचषकामधील दोन्ही उपांत्य फेरीच्या लढती आता टायब्रेकरगमध्ये जातील.
पहिल्या सामन्याप्रमाणेच वेई यी पुन्हा एकदा एसिपेन्कोविऊद्ध वेळ पाळण्याच्या दबावात सापडला. यावेळी काळ्या सोंगाट्यांसह चिनी खेळाडू खेळत होता. परंतु दबावाखाली शांत वर्तनासाठी ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने वेळ पाळताना काही अचूक चाली वापरून स्वत:ला बाहेर काढले. निकालाच्या बाबतीत खेळण्यासाठी फार कमी वेळ असल्याने एसिपेन्कोने लगेचच बरोबरीचा प्रस्ताव ठेवला. मात्र वेईने लगेच प्रस्ताव स्वीकारली नाही. असे असले, तरी हे स्पष्ट होते की दुसरा कोणताही निकाल शक्य नाही आणि 37 चालींनंतर सामना बरोबरीत सोडविण्याचा निर्णय घेण्यात आला.
दुसऱ्या उपांत्य फेरीत नोदिरबेक आणि सिंदारोव्ह यांच्यातील दुसरा सामना पहिल्यासारखाच झाला कारण दोन्ही खेळाडू अनिर्णित अवस्थेत सामना सोडविण्यावर सहमत होण्यापूर्वी खेळणे अनिवार्य असलेल्या 30 चालींपर्यंत सुरक्षित बुद्धिबळ खेळण्यात खूष असल्याचे दिसून आले.