महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दोन्ही जागा मताधिक्क्याने जिंकू

11:56 AM Dec 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजप गोवा राज्य समितीच्या बैठकीत निर्धार : लोकसभा निवडणुकीसाठी विकासावर रणनिती,दोन्ही उमेदवारांची निवड होणार जानेवारीत

Advertisement

पणजी : भारतीय जनता पक्षाने राजस्थान, छत्तीसगड व मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व राखून सत्ता काबिज केल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. गोव्यातील उत्तर व दक्षिण गोवा, या दोन्ही जागा मोठ्या मताधिक्क्याने जिंकण्याचे एकमेव ध्येय असून त्या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीची रणनिती आखण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी दिली. बैठकीत छत्तीसगड, मध्यप्रदेश व राजस्थान येथील यशाचे कौतुक करून त्यादृष्टीने गोव्यातही लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांनी भाजपला यश मिळवून देण्याचा निर्धार करण्यात आला. बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सदानंद शेट तानावडे, दक्षिण गोव्याचे माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामोदर नाईक उपस्थित होते.

Advertisement

पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा ठराव

तानावडे यांनी सांगितले की, तीन राज्यांत घवघवीत यश मिळाल्याने आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीत मांडला. ठरावाला वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी पाठिंबा दिल्यानंतर सर्वानुमते तो संमत करण्यात आला.

दोन्ही जागा जिंकण्याची रणनिती

लोकसभा निवडणुकीची आमची कार्यपद्धती कशी असेल, प्रत्येकावर कोणती जबाबदारी असेल याविषयी सर्व मंत्री, आमदार, आजी-माजी मंत्री, आमदार, पक्षाचे इतर पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. छत्तीसगड, राजस्थान व मध्यप्रदेश या मोठ्या राज्यांमध्ये भाजपला यश मिळाल्याने या वातावरणाचा फायदा घेऊन गोव्यातही कार्य जोमाने करण्याबाबत चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत भाजपला दोन्ही जागा मोठ्या मतांच्या फरकाने जिंकण्यासाठी रणनिती ठरविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

उमेदवार निवड जानेवारीत

उमेदवार निवडीबाबत तानावडे यांनी सांगितले की, उमेदवार निवडीचा अधिकार हा पूर्णपणे केंद्रीय निवडणूक समिती व पक्षाचे संसदीय मंडळ यांना आहे. राज्य समितीला उमेदवार निवडीचा कोणताच अधिकार नसल्याने त्यावर आम्ही भाष्य करू शकत नाही. त्यामुळे केंद्राकडून नावे जाहीर झाल्यानंतरच आम्ही ती जाहीर करू. येत्या जानेवारीत उमेदवारी निवडीवर निर्णय होईल, असेही ते म्हणाले. पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभागृहात भाजपच्या सर्व मंत्री, आमदार व पदाधिकाऱ्यांच्या घेण्यात आलेल्या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक, भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजयाताई रहाटकर, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा, कृषीमंत्री रवी नाईक, जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर, राज्यसभेचे माजी खासदार विनय तेंडुलकर, कळंगुटचे आमदार मायकल लोबो, मडगावचे आमदार दिगंबर कामत, ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात, पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे, वास्कोचे आमदार दाजी साळकर, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, माजी मंत्री, आमदार व पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत विकास हाच प्रमुख मुद्दा

लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना गोव्यात विकासाची गंगा वाहताना केंद्रातून आलेले प्रकल्प व त्याचा राज्याला झालेला फायदा याची माहिती मतदारांना देण्यात येईल. भाजप सरकारने केलेला विकास हा लोकसभा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा असेल आणि या विकासाच्या आधारावरच भाजप मोठ्या मताधिक्क्याने लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागांवर निर्विवाद यश संपादन करेल, असा विश्वास सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article