Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी
कवठेमहांकाळमध्ये राजकीय तापमान चढले! निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या असून आचारसंहितेच्या घोषणेकडे नेते आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या बैठका नुकत्याच मुंबईमध्ये पार पडल्या. कवठेमहांकाळ तालुक्यात रांजणी, ढालगाव, कुची आणि देशिंग डे चार जिल्हा परिषदेचे गट आणि रांजणी, हिंगणगाव, देशिंग, मळणगाव, कुची, कोकळे, ढालगाव आणि नागज, असे आठ पंचायत समितीचे गण असून १२ जागांसाठी निवडणुका होणार आहेत.
राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गद भाजप, माजी खासदार संजयकाका पाटील यांची विकास आघाडी, कॉग्रेस, दोन्ही शिवसेना अशी कपठेमहांकाळ तालुक्यातील राजकीय गणिते आहेत. आमदार रोहित पाटील, सुरेश पाटील, अनिता ताई सगरे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा तगड़ा गट, तर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याकडे असून भाजपचे संदीप गिल्डे, उक्य भोसले, मिलिंद कोरे ही मंडळी काम करतात.
तर काँग्रेसची धुरा संजय हजारे, माणिकराव भोसले, धनाजी पाटील, रावसाहेब शिंदे यांच्या खांद्यावर असून, शिवसेनेचे दोन्ही गटाचे नेते दिनकर पाटील, मारुती पवार हे काम पाहत आहेत. सर्वच पक्षाच्या या निवडणुकीतील इच्छुकांच्या नजरा निवडणुकीच्या तारखांकडे लागल्या आहेत. अनेक इच्छुक रणांगणात उतरण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत ०८ वर्षांनी जि.प. व पं. स. च्या निवडणुका होत असल्याने बाराडी मतदारसंघात इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
मुंबईमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत आमदार रोहित पाटील यांनी तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या संदर्भात माहिती दिली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचीही मुंबईत बैठक झाली माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील निवडणुकीसंदर्भातील अहवाल सादर केला.