For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचे दोन्ही संघ उपउपांत्यपूर्व फेरीत

06:17 AM Feb 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताचे दोन्ही संघ उपउपांत्यपूर्व फेरीत
Advertisement

निर्णायक सामन्यात हरमीत देसाईचा विजय

Advertisement

वृत्तसंस्था/ बुसान

हरमीत देसाईने निर्णायक पाचवा जिंकल्यानंतर भारताच्या पुरुष टेबल टेनिस संघाने येथे सुरू असलेल्या विश्व टेटे सांघिक चॅम्पियनशिपमच्या उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले तर महिला संघानेही 3-0 असा विजय मिळवित उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.

Advertisement

पुरुष संघाला विजयासाठी संघर्ष करावा लागला. कझाकस्तानवर त्यांनी 3-2 असा निसटता विजय मिळवित आगेकूच केली. महिला संघाने मात्र 3-0 असा एकतर्फी विजय मिळवित पुढील फेरीत स्थान मिळविले. पुरुष संघाची पुढील लढत बलाढ्या दक्षिण कोरियाविरुद्ध तर महिला संघाची लढत चिनी तैपेईशी होईल.

हरमीतला पहिल्या सामन्यात किरिल गेरासिमेन्कोकडून 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या सामन्यात राष्ट्रकुल सुवर्णविजेत्या अनुभवी अचंता शरथ कमलने अॅलन कुरमानगलियेव्हचा 3-2 असा पराभव करून भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. शरथ कमल या सामन्यात दोन गेम्सनी पिछाडीवर पडला होता. पण नंतरच्या गेम्समध्ये मुसंडी मारत विजय साकार केला. शरथने हा सामना 6-11, 7-11, 11-7, 13-11, 11-9 असा जिंकला. जी. साथियानने तिसरा सामना जिंकून देत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्याने प्रतिस्पर्ध्यावर 3-1 अशी मात केली. यातील दुसरा त्याने गमविला होता.

चौथ्या सामन्यात शरथ कमलला किरिल कुरमानगलियेव्हकडून 1-3 असा पराभूत झाल्याने 2-2 अशी बरोबरी झाली. हरमीतने मात्र निर्णायक सामन्यात कोणतेही दडपण न घेता 3-1 असा विजय मिळवित भारताला पुढील फेरीत स्थान मिळवून दिले.

महिला विभागात श्रीजा अकुलाने निकोलेटा स्टेफानोव्हाचा 12-10, 11-6, 11-8, मनिका बात्राने जॉर्जिया पिकोलिनचा 12-10, 11-6, 11-5, ऐहिका मुखर्जीने गाइया मोनफर्दिनीचा 15-13, 11-9, 13-15, 11-8 असा चुरशीच्या लढतीत पराभव केला.

Advertisement
Tags :

.