कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

म. ए. समितीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार

10:38 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब

Advertisement

बेळगाव : बेळगाव आणि कारवार लोकसभा मतदारसंघातून म. ए. समितीने उमेदवारी जाहीर केली असून, या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या दोन्ही उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब मध्यवर्ती म ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला. रविवारी रेल्वे ओव्हर ब्रिजवळील मराठा मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून महादेव पाटील तर कारवार मतदार संघातून निरंजन देसाई यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या दोन्ही उमेदवारांनी प्रचार देखील सुरू केला आहे. बेळगाव शहर आणि तालुका म ए समितीच्यावतीने महादेव पाटील यांची निवड करण्यात आली. तर खानापूर म. ए. समितीतर्फे निरंजन देसाई यांना उमेदवारी दिली आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत या दोन्ही नावांना सहमती देण्यात आली. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या दोन्ही उमेदवारांना मराठी भाषिक आणि आपले बहुमोल मत देऊन विजयी करण्याचे आवाहन  करण्यात आले आहे. या दोन्ही उमेदवारांचा कार्यकर्त्यांनी प्रचार करावा. मराठी भाषिकांनी एकजूट दाखवत या दोन्ही उमेदवारांना विजयी करावे. असे मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अवाहन केले.  बैठकीला बी. एल. येतोजी, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, खानापूर म. ए. समितीचे गोपाळ पाटील, गोपाळ देसाई, आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, अॅड. एम. जी. पाटील, रावजी पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. उमेदवार महादेव पाटील आणि निरंजन पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article