For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंडिया आघाडीचे दोन्ही उमेदवार विजयी होतील

12:24 PM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
इंडिया आघाडीचे दोन्ही उमेदवार विजयी होतील
Advertisement

माणिकराव ठाकरे यांचा दावा : ‘आरजीपी’चा प्रस्ताव फेटाळला

Advertisement

मडगाव : गोव्यात भाजप सरकारबद्दल मतदारांच्या मनात तीव्र नाराजी आहे. ही नाराजी स्पष्टपणे दिसून येते. गोव्यातील मतदार यावेळी इंडिया आघाडीच्या उमेदवारांना निवडून देतील, असा दावा काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेत केला. ‘आरजीपी’ तीन अटी घालून पाठिंबा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तो प्रस्ताव इंडिया आघाडीने फेटाळला आहे. काल सोमवारी इंडिया आघाडीची बैठक मडगावात झाली. या बैठकीला गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्ता, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर, आमदार कार्लुस परेरा, आम आदमी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अॅड अमित पालेकर, आमदार व्हेंन्झी व्हियेगस, राष्ट्रवादी काँग्रेसचे जुझे फिलीप व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना माणिकराव ठाकरे म्हणाले की, संपूर्ण देशात इंडिया आघाडीला पुरक असे वातावरण असून गोवा ही त्याला अपवाद नाही. पक्षाने जरी उमेदवारांची घोषणा उशिरा केली तरी गोव्यातील उमेदवार अॅड रमाकांत खलप व कॅप्टन विरियातो फर्नांडिस या दोन्ही उमेदवारांना गोव्यातील जनतेने स्वीकारले आहेत. दोन्ही उमेदवारांना मतदारांचा जबरदस्त पाठिंबा मिळत असल्याचे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. काल झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत प्रचाराची रणनिती तयार करण्यात आली. त्यात कोपरा बैठका तसेच जाहीर बैठकांवर भर दिला जाणार असून काँग्रेस पक्षाबरोबरच इंडिया आघाडीचे केंद्रीय नेते तसेच स्थानिक नेते या सभांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती श्री. ठाकरे यांनी दिली.

आरजीपीचा प्रस्ताव फेटाळला

Advertisement

‘पोगो बिल’ तसेच अन्य दोन अटी मान्य केल्यास आरजीपी इंडिया आघाडीला पाठिंबा देणार असल्याचे विधान काल आरजीपीतर्फे करण्यात आले होते. मात्र, आरजीपीची ही चाल असून आरजीपी हा भाजपचा ‘ट्रॅप’, आम्ही या ट्रॅपमध्ये येणार नसल्याचे सांगत आरजीपीचा प्रस्ताव इंडिया आघाडीने फेटाळला.

म्हादई संदर्भात इंडिया आघाडी जनतेबरोबर

लोकसभा निवडणुकीत म्हादई हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हादईच्या विषयावर विरोधी पक्षांनी विधानसभेत तसेच विधानसभेच्या बाहेर आवाज उठविला आहे. त्यामुळे म्हादईच्या विषयाकडे इंडिया आघाडी जनतेबरोबर आहे असे फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असताना म्हादईचा विषय सोडविण्यात भाजप सरकारला अपयश आल्याची टीका त्यांनी यावेळी केली. कर्नाटकात प्रचाराला गेला तर म्हादईच्या विषयावर काय बोलणार असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केला असता. माणिकराव ठाकरे म्हणाले की, प्रदेश काँग्रेस समिती जो निर्णय घेईल, तोच निर्णय अंतिम असेल व त्याकडे पक्ष बांधिल असेल.

फातोर्डा मतदारसंघात दुसरा मोती डोंगर नको

आपल्या फातोर्डा मतदारसंघात दुसरा मोती डोंगर निर्माण करायचा नाही. फातोर्ड्यातील जनता सुज्ञ आहे. ती आमदार दिगंबर कामत यांना फातोर्ड्यात स्वीकारणार नाही. दिगंबर कामत यांनी मडगावचे रूपांतर भंगार अ•dयात केलेय हे  सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी फातोर्ड्यातील मतदार त्यांना बळी पडणार नाही अशी टीका आमदार विजय सरदेसाई यांनी यावेळी केली.

Advertisement
Tags :

.