बॉसने कर्मचाऱ्यांना वाटले गिफ्ट
दीड कोटीचा बंगला, गाडी, विदेशात सुटी
जगातील सर्व कंपन्यांना स्वत:च्या कर्मचाऱ्यांनी सर्वोत्तम कामगिरी करावी असे वाटत असते. तर कर्मचारी हे कामाच्या बदल्यात उत्तम सुविधा आणि बोनस मिळत रहावा असे इच्छित असतात. परंतु कर्मचाऱ्यांना त्यांच्या इच्छेनुसार सर्वकाही मिळत नसते ही बाब वेगळी. परंतु एक कंपनी स्वत:च्या कर्मचाऱ्यांकरता सढळहस्ते खर्च करत आहे.

या कंपनीने स्वत:च्या कर्मचाऱ्यांना मालामाल केले आहे. आता हे कर्मचारी या रिवॉर्ड्सना सोशल मीडियावर प्रदर्शित करत आहेत. मलेशियातील कंपनी जेआरएम होलिस्टिकने स्वत:च्या कर्मचाऱ्यांकरता मोठी रक्कम खर्च केली आहे. या कंपनीने कर्मचाऱ्यांना स्वत:च्या बॉसकडुन मिळालेल्या गिफ्ट्सना फ्लॉन्ट केले आहे. यानुसार कर्मचाऱ्यांना घर, घरासाठी पैसे, ट्रॅव्हल पॅकेज आणि अन्य लक्झरी गिफ्ट्स देण्यात आले आहेत. हे गिफ्ट्स त्यांना कंपनीच्या वार्षिक डिनरदरम्यान देण्यात आल्या आहेत. 2024 मध्ये पूर्ण वर्ष काम केल्यावर अखेर इनाम मिळाले. परंतु हा बोनस नव्हता. यात घर, गाडी, घरासाठी रक्कम आणि आकर्षक वस्तू होत्या असे काकटीई नावाच्या कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर नमूद केले आहे.
कंपनीकडुन देण्यात आलेले सर्वात मोठे इनाम हे दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा बंगला होते. हा बंगला कंपनीचा टॉप परफॉर्मर पुआन हिदायाह युस्मान यांना देण्यात आला. तर इतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरीनुसार घर गिफ्ट करण्यात आले. कुणाला घर खरेदी करण्यासाठी पैसेही मिळाले. तर काही जणांना विदेशात लक्झरी व्हेकेशनचे व्हाउचर मिळाले आहे. तर काही कर्मचाऱ्यांना आलिशान कार देण्यात आली. याचबरोबर फर्निचर पॅकेज, हाउसहोल्ड अॅप्लायंसेस, हँडबॅग्स आणि इतर गोष्टींचेही वाटप करण्यात आले आहे.