अंगठ्यांशिवाय झाला जन्म
आमच्या शरीराचा प्रत्येक छोटा-मोठा हिस्सा कुठल्या न कुठल्या कामाचा असतो आणि सामान्य दिवसांमध्ये त्याचे महत्त्व समजत नाही, परंतु ते अत्यंत महत्त्वपूर्ण असतात, हे सत्य आहे. हाताच्या अंगठ्याशिवाय कुठलीही सामग्री पकडणे अशक्य वाटू लागते. परंतु एका इसमाने हे शक्य करून दाखविले आहे. नेदरलँडमध्ये राहणारा इसम अंगठ्यांशिवाय जन्माला आला.
नेदरलम्समध्ये राहणारा 26 वर्षीय कियो आल्बर्सने अंगठ्याशिवाय हात अपूर्ण असल्याची धारणा चुकीची ठरविली आहे. कियो हा चीनमध्ये अंगठ्यांशिवाय जन्मला होता, वयाच्या केवळ 4 महिन्यांच्या वयात त्याला कुणी दत्तक घेतले आणि तो नेदरलँड्समध्ये आला. परंतु युरोप त्याला कधीच पूर्णपणे घरासारखे जाणवले नाही. बालपणी अंगठा नसणे कियोसाठी एका मोठ्या असुरक्षेचे कारण होते. शाळा आणि समाजात त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात होते, परंतु हळूहळू त्याने प्रवासाला स्वत:चे साधन पेले आणि अनेक वर्षे युरोप फिरत घालविली. या यात्रांनी त्याचा आत्मविश्वास मजबूत केला आणि स्वत:च्या कमतरतेला शक्तीत बदलणे तो शिकला. कियो आता एक कंटेंट क्रिएटर आणि इंग्लिश ट्यूटर आहे. तो सोशल मीडिया अकौंट्स खासकरून टिकटॉकवर हजारो फॉलोअर्ससोबत स्वत:चे व्हिडिओ शेअर करतो. त्याच्या व्हिडिओत अंगठ्याशिवाय दैनंदिन कामे करताना तो दिसून येतो. कियोने स्वत:च्या स्थितीला हास्याचा हिस्सा केले आहे. अंगठा हा पर्यायी असल्याचा मी जिवंत पुरावा असल्याचे तो सांगतो. देवाने माझी बोटं इतकी सुंदर तयार केली आहेत की, त्याने अंगठे स्वत:कडेच ठेवून घेतल्याचे तो म्हणत असतो.