महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बोपण्णा-एब्डन उपांत्य फेरीत

06:38 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मियामी गार्डन्स, अमेरिका

Advertisement

भारताचा टेनिसस्टार रोहन बोपण्णा व त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डन यांनी येथे सुरू असलेल्या मियामी ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले. त्यांनी उपांत्यपूर्व लढतीत हॉलंडचा सेम व्हरबीक व ऑस्ट्रेलियाचा जॉन-पॅट्रिक स्मिथ यांचा पराभव केला.

Advertisement

यावर्षीची ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकलेल्या बोपण्णा-एब्डन यांनी चुरशीच्या लढतीत व्हरबीक-स्मिथ यांच्यावर 3-6, 7-6 (7-4), 10-7 अशी मात केली. 41 वर्षीय बोपण्णा या विजयामुळे एटीपी दुहेरीच्या मानांकनात टॉप टेनमध्येच राहणार असून यामुळे त्याला पॅरिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरणार आहे. सध्या तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. या जोडीला येथील स्पर्धेत अग्रमानांकन मिळाले आहे.  ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील यशानंतर बोपण्णा दुहेरीच्या मानांकनात अग्रस्थानी पोहोचला होता. पण दुबई चॅम्पियनशिप व इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेत तो लवकर पराभूत झाल्याने त्याची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. उपांत्य फेरीत त्यांची लढत मार्सेल ग्रॅनोलर्स-होरासिओ झेबालोस किंवा लॉईड ग्लासपूल-जीन ज्युलियन रॉजेर यापैकी एका जोडीशी होईल. गेल्या जानेवारीत बोपण्णा-एब्डन जोडीने अॅडलेड ओपन स्पर्धेतही अंतिम फेरी गाठली होती. पण त्यावेळी त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article