For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बोपण्णा-एब्डन, भांब्री-रॉबिन उपांत्यपूर्व फेरीत

06:28 AM Feb 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
बोपण्णा एब्डन  भांब्री रॉबिन उपांत्यपूर्व फेरीत
Advertisement

दुबई ड्युटी फ्री टेनिस चॅम्पियनशिप, सुमित नागल एकेरीत पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

अग्रमानांकित रोहन बोपण्णा व त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डन यांनी येथे सुरू असलेल्या दुबई ड्युटी फ्री टेनिस चॅम्पियनशिपमध्ये पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. त्यांनी ट्युनिशिया-पाकच्या स्कन्दर मन्सूरी व ऐसाम उल हक कुरेशी यांचा पराभव केला.

Advertisement

बोपण्णा-एब्डन यांनी गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. त्यांनी मन्सूरी-कुरेशीवर 7-6 (7-4), 7-6 (7-5) असा एक तास 41 मिनिटांच्या चुरशीच्या खेळात पराभव केला. ऑस्ट्रेलियन स्पर्धेनंतर बोपण्णा-एब्डन यांची ही एकत्र खेळण्याची पहिलीच स्पर्धा आहे. त्यांची पुढील लढत उरुग्वेचा एरियल बेहर व झेकचा अॅडम पावलासेक यांच्याशी होईल.

अन्य एक भारतीय युकी भांब्री नेदरलँड्सच्या रॉबिन हाससमवेत खेळत असून या जोडीनेही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्यांनी कझाकचा अलेक्झांडर बुबलिक व फ्रान्सचा अॅड्रियन मॅनारिनो यांच्यावर 6-7 (6-8), 6-3, 10-8 अशी मात केली. युकी-हास यांची पुढील लढत बेल्जियच्या सँडर गिले-जोरान व्हिलिगेन व तिसऱ्या मानांकित जमाल मरे व मायकेल व्हीनस यापैकी एका जोडीशी होईल. एकेरीत मात्र भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले. सुमित नागलला पहिल्याच फेरीत इटलीच्या लॉरेन्झो सोनेगेकडून 4-6, 7-5ण् 1-6 असा पराभव स्वीकारावा लागला.

Advertisement
Tags :

.