महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बोपण्णा-एब्डन जेतेपदासमीप

06:00 AM Jan 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ऑस्ट्रेलिया ओपन : महिला एकेरीत साबालेन्का-किनवेन यांच्यात जेतेपदाची लढत

Advertisement

वृत्तसंस्था /मेलबर्न

Advertisement

हन बोपण्णाने ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्याची आणखी एक संधी निर्माण केली असून येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत त्याने ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डनसमवेत अंतिम फेरी गाठली आहे. महिला एकेरीत जागतिक द्वितीय मानांकित विद्यमान विजेत्या बेलारुसच्या आर्यना साबालेन्काने अंतिम फेरी गाठताना कोको गॉफचे आव्हान संपुष्टात आणले. बोपण्णा-एब्डन यांनी अतिशय चुरशीच्या झालेल्या उपांत्य लढतीत टॉमस मॅशॅच व झँग झिझेन यांच्यावर सुपर टायब्रेकरमध्ये 6-3, 3-6, 7-6 (10-7) अशी मात केली. सुमारे दोन तास ही झुंज रंगली होती. झँग (54 वा मानांकित) व टॉमस (75 वा मानांकित) हे दोघेही एकेरीचे उत्तम खेळाडू असून टॉप 100 मध्ये त्यांचा समावेश आहे. बेसलाईनवरून पॉवरफुल फटके मारण्याची त्यांची क्षमता अनुभवी बोपण्णा व एब्डन यांना अडचणीची ठरत होती. पण अनुभवाच्या जोरावर त्यांनी विजय मिळवित अंतिम फेरीत धडक मारली. यापूर्वी बोपण्णाने यूएस ओपनमध्ये दोनदा (2013, 2023) अंतिम फेरी गाठली होती. मात्र आजवर त्याला ग्रँडस्लॅम ट्रॉफी जिंकण्यात यश आले नव्हते. ती कसर भरून काढण्याची संधी त्याला यावेळी पुन्हा एकदा मिळाली आहे.

साबालेन्का, किनवेन अंतिम फेरीत

टेनिसचे दर्जेदार प्रदर्शन करीत बेलारुसच्या आर्यना साबालेन्काने अमेरिकेच्या कोको गॉफचे आव्हान संपुष्टात आणत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिने चौथ्या मानांकित गॉफवर 7-6 (7-2), 6-4 अशी मात केली. सुमारे पावणेदोन तास ही लढत रंगली होती. गेल्या वर्षी अमेरिकन ओपन अंतिम फेरीत गॉफने साबालेन्काला पराभूत करून जेतेपद पटकावले होते. त्या पराभवाची परतफेड साबालेन्काने येथे केली. जेतेपदासाठी तिची लढत 12 व्या मानांकित चीनची झेंग किनवेनशी होईल. सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठत साबालेन्काने सेरेना विल्यम्सशी बरोबरी केली आहे. सेरेनाने 2016 व 2017 मध्ये या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावत व्हिक्टोरिया अझारेन्काच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधीही तिला मिळाली आहे. अझारेन्काने 2013 मध्ये हा विक्रम केला होता. पावसामुळे हा सामना बंदिस्त छताखाली खेळविण्यात आला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात चीनच्या झेंग किनवेनने युक्रेनच्या यास्त्रेम्स्काचा 6-4, 6-4 असा पराभव करून पहिल्यांदाच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. गेल्या दशकभरात या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी चीनची ती पहिली महिला टेनिसपटू बनली आहे. एक तास 42 मिनिटे ही लढत चालली होती. या विजयामुळे किनवेन आता टॉप टेनमध्ये पोहोचणार आहे. यापूर्वी 2014 मध्ये लि ना हिने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठत जेतेपदही पटकावले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article