सौंदत्ती यात्रेसाठी 113 एसटीचे बुकींग
कोल्हापूर :
सौदत्ती यात्रेसाठी आतापर्यंत 113 एसटी बस बुकींग झाल्या आहेत. आज, गुरूवारी सायंकाळपर्यंतच बुकींग खुले राहणार आहे. यानंतर बुकींग बंद होणार असल्याची माहिती संभाजीनगर स्थानक प्रमुख एस.ए. शिंगाडे यांनी दिली आहे.
सौदत्ती यात्रेसाठी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. यामधील बहुतांशी भाविक एसटी बसने जातात. यंदा 11 ते 17 डिसेंबर दरम्यान, यंत्रा असणार आहे. यासाठी आगाऊ एसटी बस बुकींग करावी लागतात. गेल्या आठ दिवसांपासून संभाजीनगर बसस्थानक येथे बस बुकींगची प्रक्रिया सुरू झाली आहे. बुधवारपर्यंत 113 बस बुकींग झाल्या आहेत. स्टेट बदलत असल्याने एसटी प्रशासनाला आरटीओकडून परमीट घ्यावे लागते.
केवळ 10 रूपये खोळंबा आकार
यात्रा आयोजकांसाठी यंदा खोळंबा आकारावरील खर्च कमी होणार आहे. एसटी प्रशासनाने यंदा केवळ दिवसा 10 रूपये खोळंबा आकार केला आहे. गतवर्षी हाच 20 रूपये होता. तर 9 वर्षापूर्वी 120 रूपये इतका होता.