महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

नवी बाईकच केली बुक

06:40 AM Mar 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अचानक एखादी समस्या निर्माण झाली तर ती सोडविण्यासाठी कोण कसा उपाय शोधून काढेल हे सांगता येणे कठीण आहे. कित्येकदा अशा लोकांचे उपाय ऐकून आपण थक्क होऊन जातो. अशी कल्पना अशा कठीण स्थितीत या व्यक्तीला सुचली तरी कशी, असा प्रश्न पडतो. तर काहीवेळा असे अद्भुत उपाय शोधणाऱ्या व्यक्ती टीका किंवा प्रशंसेला पात्र ठरतात, हेही आपण पाहतो.

Advertisement

एक व्यक्ती मोटरसायकलवरुन जात असताना त्याची बाईक अचानक बंद पडली. प्रयत्न करुनही ती सुरु होईना. जवळपास कोठे मेकॅनिकही मिळेना. किंवा मार्गावरुन जाणारे इतर कोणी थांबून सहाय्यही करेनाता . असे झाल्यास बाईक चालवत गॅरेजपर्यंत नेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण या व्यक्तीने एक वेगळीच शक्कल लढविली. त्याने आपल्याजवळच्या मोबाईलवरुन एक बाईक टॅक्सी बुक केली. ज्या ठिकाणी त्याची बाईक बंद पडली होती, त्या स्थानी येण्यास त्याने त्या बाईक टॅक्सी चालकाला सांगितले. बाईक टॅक्सी त्या स्थानी पोहचल्यानंतर त्याने त्या बाईक टॅक्सी चालकाला आपल्या खराब बाईकला पायाचा आधार देऊन गॅरेज पर्यंत पोहचविण्याची विनंती केली. बाईक टॅक्सी चालकाने प्रथम नकार दिला. मात्र, नंतर या व्यक्तीची अडचण ओळखून त्याने ही विनंती मान्य केली. अशा प्रकारे अखेर खराब झालेली बाईक मेकॅनिकपर्यंत नेण्यात दोघांना यश आले. या व्यक्तीने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करुन इंटरनेटवर प्रसिद्ध केला आहे.   हा व्हिडीओ सध्या बराच लोकप्रिय होत असून पुष्कळ लाईक्स मिळाले आहेत.

Advertisement

Advertisement
Next Article