Satara : साताऱ्यात ग्रंथ महोत्सवाला उत्साहात प्रारंभ; पुस्तकदिंडीने वाचनसंस्कृतीचा जागर
साताऱ्यात ग्रंथ महोत्सवाचा शुभारंभ
सातारा : सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती तर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रंथ महोत्सवाला आजपासून (शुक्रवार, दि. ७ नोव्हेंबर) उत्साहात सुरुवात झाली. सयाजीराव महाविद्यालय येथे ग्रंथ दिंडीचा शुभारंभ रयत शिक्षण संस्थेचे सचिव श्री. विकास देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञान, संस्कार आणि समाजजागृतीचा संदेश देणाऱ्या या ग्रंथोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद, लोकवाणी, कवी संमेलन तसेच साहित्यप्रेमींसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
“वाचन संस्कृती जोपासणे आणि नव्या पिढीत पुस्तकांविषयी प्रेम निर्माण करणे, हा या ग्रंथ महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे,” असे ग्रंथ महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. यशवंत पाटणे यांनी सांगितले.
या प्रसंगी कार्यवाह, शरीरचिटणीस, उपाध्यक्ष प्राचार्य लांडगे, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, साहेबराव होळ आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहात ग्रंथ दिंडीत सहभाग नोंदविला