कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिवाजी विद्यापीठात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

12:38 PM Dec 31, 2024 IST | Radhika Patil
Book exhibition inaugurated at Shivaji University
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह नागरिकांनी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा‘ या उपक्रमांतर्गत विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्रात आयोजित ग्रंथ प्रदर्शन, मोफत वाचन यांसह आयोजित विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले.

Advertisement

शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्रामध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा‘ या उपक्रमांतर्गत आयोजित विविध प्रकारच्या ग्रंथांच्या प्रदर्शनाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के व कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी ग्रंथ प्रदर्शनासह संदर्भ ग्रंथ दालनामधील विशेष प्रदर्शनाचीही पाहणी केली. संचालक डॉ. धनंजय सुतार आणि डॉ. प्रकाश बिलावर यांनी प्रदर्शनात मांडलेल्या ग्रंथांची वैशिष्ट्यांची माहिती कुलगुरूंना दिली. विद्यापीठातर्फे प्रकाशित निवडक 25 ग्रंथ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित 15 ग्रंथ, साहित्य अकादमीकडून प्रकाशित 90 ग्रंथ तसेच 35 दुर्मिळ संदर्भ ग्रंथ मांडले आहेत. यामध्ये विश्वकोश, नकाशे आणि इतर संदर्भ ग्रंथांचा समावेश आहे. प्रदर्शनस्थळी निवडक वाचनीय शंभर पुस्तकांची यादी सुद्धा वाचकांच्या सोयीसाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. दुर्मिळ ग्रंथ विभागामध्ये एकूण 153 दुर्मिळ ग्रंथ प्रदर्शनात मांडले आहेत. हस्तलिखिते, ताम्रपट तसेच कोल्हापूर परिसरात उत्खननांतर्गत मिळालेल्या वस्तू देखील आहेत. शिवाजी विद्यापीठाची स्थापनेनंतर विद्यापीठ ग्रंथालयात दाखल झालेले रसायनशास्त्राचे पहिले पुस्तक देखील पाहता येणार आहे. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम यांची स्वाक्षरी असलेली ‘अग्निपंख‘ पुस्तकाची प्रतही प्रदर्शनामध्ये आहे. त्याशिवाय भारतीय राज्यघटनेची दुर्मिळ मूळ प्रत देखील वाचकांना येथे पाहता येणार आहे. यावेळी ग्रंथालयशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. सचिनकुमार पाटील, डॉ. शिवराज थोरात यांच्यासह ज्ञानस्रोत केंद्रातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदरचे ग्रंथ प्रदर्शन 1 ते 15 जानेवारी या कालावधीत सुरू राहणार असून ते सर्वांसाठी खुले आहे. या कालावधीमध्ये बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्रातील पुस्तके तेथेच बसून वाचण्यासाठी सर्वांसाठी विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वाचकांनी केंद्राला भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी करावी, तसेच त्यांना हव्या त्या पुस्तकांचे वाचन करावे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article