कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘सीपीआर’मध्ये लवकरच थॅलेसेमियावर ‘बोन मॅरो ट्रिटमेंट’

11:50 AM May 08, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर / इम्रान गवंडी : 

Advertisement

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयामध्ये (सीपीआर) थॅलेसेमिया रूग्णांवर प्रभावी ठरणारे बोन मॅरो उपचाराची सुविधा आता लवकरच उपलब्ध होणार आहे. बोन मॅरो उपचारासाठी खासगी रुग्णालयात सुमारे 15 ते 20 लाखापर्यंत खर्च अपेक्षित आहे. मात्र, सीपीआरमध्ये हे उपचार मोफत केले जाणार आहेत. याचा गरीब व गरजूंना लाभ होणार आहे. शेंडा पार्क येथे नव्याने उभा राहणाऱ्या हॉस्पिटलमध्ये तीन महिन्यात बोन मॅरो उपचाराची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे यांनी दिली. यापाठोपाठ मातेच्या गर्भातच शिशुला थॅलेसेमियाचे निदान करणारे तंत्रज्ञ गतवर्षी उपलब्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले. आज जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त घेतलेला आढावा.....

Advertisement

दरवर्षी 8 मे रोजी जागतिक थॅलेसेमिया दिन साजरा केला जातो. या आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांमध्ये जागरूकता, तपासणी आणि काळजी घेण्यास प्रोत्साहित करतो. समुदायांना एकत्र करणे, रुग्णांना प्राधान्य देणे अशी यंदाची थीम आहे. आहे. थॅलेसेमिया असलेल्या व्यक्तींच्या केवळ वैद्यकीयच नव्हे तर भावनिक आणि सामाजिक गरजा पूर्ण करणाऱ्या उपक्रमाला प्रोत्साहन देते. कोल्हापूर जिल्ह्यात 300 रूग्णांची नोंद आहे. यांच्यावरील औषधे, रक्त बदलणे आदी उपचार मोफत केले जातात

थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक रक्तविकार आहे जो शरीराच्या हिमोग्लोबिन तयार करण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो, लाल रक्तपेशींमधील प्रथिने जे ऑक्सिजन वाहून नेतात. जेव्हा हिमोग्लोबिनचे उत्पादन बिघडते तेव्हा लाल रक्तपेशी योग्यरित्या कार्य करत नाहीत आणि जलद तुटतात, त्यामुळे अशक्तपणा होतो. थॅलेसेमियाची तीव्रता अनुवंशिकतेने मिळालेल्या जनुक उत्परिवर्तनांच्या संख्येवर आणि प्रकारावर अवलंबून असते.

नवजात शिशुला थॅलेसेमिया आहे की नाही याचे निदान गर्भवती महिलेच्या प्रसुतीपूर्व तपासणीमध्ये होणार आहे. सीपीआरमध्ये गत वर्षी या तपासणीची सुविधा उपलब्ध झाली आहे. हा आजार अनुवंशिक आहे. मूल मोठे झाल्यावर याची लक्षणे दिसतात. त्यानंतर याचे निदान होते. पण आता आईच्या गर्भातच बाळाला थॅलेसेमियाचे निदान होणार आहे. यामुळे पुढील धोके टळणार आहेत. गर्भातच नवजात शिशुच्या नाळेतील रक्ताचे नमुने घेऊन निदान केले जाते.

सीपीआरमध्ये यावरील सर्व उपचार मोफत केले जातात. लवकरच महागडी बोन मॅरो उपचार पद्धतीही उपलब्ध करून देणार आहे. यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. याचा प्रसार रोखण्यासाठी शासनाच्या सुचनांचे पालन करावे.

                                                                                                                                                                डॉ. सत्यवान मोरे, अधिष्ठाता

फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशन संस्थेच्या वतीने दुर्मिळ रक्तगटाच्या रूग्णांना रक्तदाते उपलब्ध करून दिले जातात. दिव्यांग योजना, पेन्शन योजना, मोफत तपासण्या, औषधे दिली जातात. बोन मॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन करून फंड जमा करण्यासाठी रूग्णांना मदत केली जाते.

                                                                                                    धनंजय नामजोशी, अध्यक्ष, फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशन

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article