For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणूक आयोगाकडून ‘रोखे’ माहिती; स्टेट बँकेने पुरविली आकडेवारी

07:10 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
निवडणूक आयोगाकडून ‘रोखे’ माहिती  स्टेट बँकेने पुरविली आकडेवारी
Advertisement

अनुक्रमांकही केले सार्वजनिक, 

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांची सर्व माहिती सार्वजनिक केली आहे. आपल्या संकेतस्थळावरुन ही माहिती देताना निवडणूक रोख्यांचे अनुक्रमांकही उघड करण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोणत्या कंपनीने अगर व्यक्तीने कोणत्या राजकीय पक्षाला किती रक्कम देणगी म्हणून दिली, हे स्पष्ट होणार आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार केवळ रक्कम समजली होती. पण ती कोणाकडून मिळाली हे समजले नव्हते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही सर्वच माहिती आता सर्वांना पाहता येणार आहे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ही सर्व माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला पुरविली आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही आठवड्यांपूर्वी केंद्र सरकारने 2019 मध्ये लागू केलेली निवडणूक रोखे पद्धती बंद करण्याचा निर्णय दिला होता. तसेच विशिष्ट कालावधीत 2019 पासून आतापर्यंत जितके रोखे खरेदी पेले गेले त्यांची सर्व माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्याचा आदेशही दिला होता. निवडणूक आयोगाने ही माहिती आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावी असाही आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानुसार आता सर्व माहिती उघड करण्यात आली आहे.

Advertisement

जशीच्या तशी प्रसिद्धी

स्टेट बँकेने जी महिती जशी पुरविली आहे, तशी ती प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता प्रसिद्ध करण्यासारखे काहीही उरलेले नाही. निवडणूक रोख्यांची संख्या, प्रत्येक रोख्याची रक्कम, रोखे खरेदी करणाऱ्या देणगीदाराचे नाव, त्याने कोणत्या पक्षाचे रोखे किती किमतीला विकत घेतले, ही माहिती, अशी सर्व आकडेवारी, रोख्यांच्या अनुक्रमांकासह प्रसिद्ध झाल्याचे प्रतिपादन आयोगाने केले आहे.

स्टेट बँकेचे प्रतिज्ञापत्र

केंद्रीय निवडणूक आयोगाला सर्व माहिती दिली आहे, असे स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र स्टेट बँकेने गुरुवारी दुपारी सर्वोच्च न्यायालयात सादर केले होते. जी माहिती बँकेकडे उपलब्ध आहे, ती सर्व आता केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. प्रत्येक रोख्याचा अनुक्रमांकही देण्यात आला आहे, असा आशय या प्रतिज्ञापत्रात असल्याची माहिती नंतर स्टेट बँकेकडून पत्रकारांना देण्यात आली.

Advertisement
Tags :

.