महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सफाई कर्मचाऱ्यांचे बोंब मारो आंदोलन

11:26 AM Sep 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महानगरपालिकेसमोर विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा दिवसभर ठिय्या : 100 कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्याबाबत टाळाटाळ

Advertisement

बेळगाव : सफाई कामगार दिनादिवशीच आपणाला नोकरीत कायमस्वरुपी सामावून घेणे यासाठी सफाई कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेसमोर बोंब मारो आंदोलन केले. गेल्या दीड वर्षापासून आम्ही ही मागणी करीत आहोत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करत, तसेच इतर विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळीच आंदोलन छेडले. यामुळे महानगरपालिकेच्या कार्यालयात ये-जा करणेही अवघड झाले होते. सफाई कर्मचारी गेली अनेक वर्षे कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. यापूर्वी 154 कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. मात्र 100 कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यासाठी टाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांबरोबरच चालकांनीही यामध्ये भाग घेतला होता. त्यामुळे महानगरपालिकेच्या परिसरातच कचरा वाहतूक वाहने पार्किंग करण्यात आली होती. जोपर्यंत आपणाला लेखी दिले जात नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, असा आग्रह त्यांनी धरला.

Advertisement

गेल्या अनेक वर्षांपासून सफाई कर्मचारी आणि मैलावाहू कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना क्वॉर्टर्स देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत आश्वासनाव्यतिरिक्त कोणतेच पाऊल उचलण्यात आले नाही. आनंदवाडी येथे रमाबाई आंबेडकर हॉलमध्ये ग्रंथालय मंजूर करण्यात आले आहे. वाल्मिकी भवनच्या बांधकामास निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्याच्या कामाला अद्याप सुरुवात करण्यात आली नाही. 38 लाख रुपये मंजूर झाले, असे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले. निधी मंजूर झाला असेल तर कामाला का सुरुवात नाही? असा प्रश्नही निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. 154 मधील काही कर्मचाऱ्यांना अजूनही वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे. तेव्हा त्यांनाही तातडीने वेतन द्यावे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सफाई कर्मचाऱ्यांना पहाटेच्यावेळी नाष्टा दिला पाहिजे. मात्र तो नियमित दिला जात नाही. तेव्हा त्याबाबतही महानगरपालिकेने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. या मागण्यांसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात आले. यावेळी सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक वाघेला, जनरल सेक्रेटरी विजय निरगट्टी, मुनीस्वामी भंडारी, षण्मुख आंदेद्र यांच्यासह इतर पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनपा आयुक्तांची आज भेट घेणार...

सफाई कर्मचारी संघटनेने सायंकाळी उशिरापर्यंत आंदोलन सुरूच ठेवले. त्यानंतर प्रशासकीय उपायुक्त उदय कुमार तळवार हे त्यांच्यासमोर आले. तुमच्या मागण्या पूर्ण करू, मात्र आंदोलन मागे घ्या, अशी विनंती केली. मनपा आयुक्त धारवाडला गेल्यामुळे ते उद्या तुमची भेट घेणार आहेत, असे सांगितले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यामुळे मंगळवार दि. 24 रोजी सकाळी 10 वाजता महानगरपालिकेसमोर पुन्हा सफाई कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहून आयुक्तांची भेट घेणार आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article