महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बोगस लेबरकार्ड शोधमोहिमेला प्रारंभ

10:44 AM Nov 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जिल्ह्यात 1778 कार्डे रद्द, कामगारांच्या सुविधांचा दुरुपयोग करण्यावर नियंत्रण

Advertisement

बेळगाव : राज्य सरकारने बोगस बीपीएल कार्डे रद्द करण्याचा सपाटा काही दिवसांपूर्वी चालविलेला असताना आता कामगार खात्याने बोगस लेबरकार्ड शोधून ती रद्द करण्याची मोहीम हाती घेतली आहे. एका बेळगाव जिल्ह्यात 1 हजार 778 बोगस लेबरकार्डे आढळून आली असून खात्याने ती रद्दबातल केली आहेत. बांधकाम कामगारांच्या नावे कार्ड बनवून घेऊन कर्नाटक बांधकाम-इतर निर्मिती कामगार कल्याण मंडळाच्या सुविधांचा लाभ घेत असलेल्या बोगस कामगारांवर ही कारवाई झाली आहे. मंडळामार्फत कामगार व त्यांच्या मुलांना मिळणाऱ्या सुविधांचा बोगस कामगार लाभ उठवत असल्याचे कामगार खात्याच्या निदर्शनास आल्यानंतर लेबरकार्ड तपासण्याची मोहीम हाती घेण्यात आली. यामुळे मूळ कामगारांना न्याय मिळाला असल्याचे सिद्ध झाले आहे.

Advertisement

जिल्ह्यात बोगस लेबरकार्डांचा सुळसुळाट सुरू असल्याच्या तक्रारी कामगार खात्याकडे आल्या होत्या. यासाठी मागील वर्षीही बोगस लेबरकार्डे शोधून ती रद्दबातल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. आता बेळगाव कामगार अधिकारी उपविभाग-1 मध्ये नोंदणी असलेल्या 18 हजार 442 लेबरकार्डे व उपविभाग-2 मध्ये नोंद असलेल्या 1 लाख 26 हजार 778 लेबरकार्ड अशा एकूण 1 लाख 45 हजार 220 लेबरकार्डांची तपासणी केली. यामध्ये 1 हजार 778 लेबरकार्डे बोगस असल्याचे आढळून आले.

इमारत बांधकाम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी कर्नाटक बांधकाम व इतर निर्मिती कामगार कल्याण मंडळ कार्यरत असून कामगारांना विविध सुविधा देत आले आहे. शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत, बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक मदत, लॅपटॉप वितरण, विवाह कार्यासाठी मदत, कामावर असताना अपघात घडल्यास जखमी झालेल्या कामगाराला आर्थिक मदत, बांधकाम कामावर असताना अपघातात दुर्दैवाने मृत्यू झाल्यास संबंधित कामगाराच्या कुटुंबीयांना सामाजिक सुरक्षा देण्यात मंडळ कार्यरत आहे. बांधकाम कामगार लेबरकार्डवरून कामगार खात्याच्या सुविधा मिळू शकतात.

यापूर्वी सेवासिंधू पोर्टलवर बांधकाम कामगारांनी नावनोंदणीसाठी अर्ज करणे आवश्यक होते. तर आता कामगार खात्यामध्येच नवी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आली आहे. त्याद्वारेच कामगारांची नावनोंदणी करण्यात येते. तरीही कामगार खात्याला खोटी माहिती देऊन अर्ज सादर केल्यास सॉफ्टवेअरमार्फत तशांचा शोध घेऊन अर्ज रोखण्यात येतो. त्यामुळे बोगस कार्डांचा शोध घेण्यासाठी कामगार खात्याकडे दोन पर्याय आहेत. एकीकडे कामगारांनी लेबरकार्ड मिळविण्यासाठी नव्याने अर्ज केल्यानंतर व लेबरकार्डाच्या नूतनीकरणासाठी नोंदणी करताना कामगार खात्याकडून शहानिशा होत असते. प्रतिवर्षी लेबरकार्डचे नूतनीकरण करणे कामगारांना सक्तीचे आहे. वर्षभरात किमान 90 दिवस बांधकाम कामात व्यस्त असल्यासच संबंधित कामगारांना लेबरकार्डचे नूतनीकरण करण्यात येते, अशी माहिती कामगार खात्याकडून उपलब्ध झाली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article