एसकेई संस्थेत बाबुराव ठाकुर यांची 125 वी जयंती साजरी
एसकेई संस्थेच्या जीएसएस-आरपीडी महाविद्यालयात आयोजन
प्रतिनिधी/ बेळगाव
येथील एसकेई संस्थेच्यावतीने संस्थापकांपैकी एक असलेले कै. बाबुराव ठाकुर यांची 125 वी जयंती येथील जी. एस. एस. आणि आर. पी. डी. महाविद्यालयांच्या ग्रंथालयात साजरी करण्यात आली. प्रारंभी संस्थेचे सचिव मधुकर सामंत, डिग्री कॉलेजच्या अध्यक्षा माधुरी शानभाग, उपाध्यक्षा बिंबा नाडकर्णी आणि दोन्ही कॉलेजच्या प्राचार्यांच्या हस्ते बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर बाबुराव ठाकुर यांच्या कार्याचा आढावा घेणारा प्रा. विजयकुमार पाटील यांचा लेख मराठी विषयप्रमुख परसु गावडे यांनी वाचून दाखवला. रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. संदीप देशपांडे यांनी आभार व्यक्त केले.
प्रास्ताविक ग्रंथपाल नमिता चंदगडकर यांनी केले. यावेळी जी. एस. एस. कॉलेजचे प्राचार्य अरविंद हलगेकर, पीयू कॉलेजचे प्राचार्य सुभाष देसाई आणि आर. पी. डी. चे प्रभारी प्राचार्य एम. एस. कुरणी आणि पी. यू. कॉलेजच्या प्राचार्या सुजाता विजापुरे यांच्यासह लोकमान्य एज्युकेशनचे प्रा. मिसाळे, जांबोटी कॉलेजच्या प्राचार्या पूजा पाटकर आणि दोन्ही संस्थांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.