बेळगावच्या शरीरसौष्ठवपटूंची जागतिक स्पर्धेसाठी निवड
11:26 AM Nov 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : इंडोनेशियात होणाऱ्या जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी बेळगावचे शरीरसौष्ठवपटू प्रशांत खन्नुकर, व्ही. बी. किरण व व्यंकटेश ताशिलदार यांची अभिनंदन निवड झाली आहे. या व्यायामपटूना जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, राहुल जारकीहोळी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी अजित सिद्धण्णवर, एम. गंगाधर, हेमंत हावळ, नागराज कोलकार, गणेश गुंडप, रियाज चौगुले उपस्थित होते. ऋतुजा सुतार आणि साक्षी खंदारेला या स्पर्धेत वैयक्तिक चॅपियन्सचा बहुमान मिळाला. प्रथम आणि द्वितीय स्थान घेतलेल्या सर्व खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांना अनंत गाडगीळ, मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी व मजुंनाथ गोल्लीहळी यांचे प्रोत्साहन लाभत आहे.
Advertisement
Advertisement