महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

फीलिंगसोबत बदलतो शरीराचा रंग

06:04 AM Mar 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संतापात पिवळा, भीतीत लाल अन् नेराश्यात निळा

Advertisement

भावना माणसांचे वर्तन आणि मानसिक स्थितीला नियंत्रित करत असतात. केवळ एवढेच नव्हे तर तुमच्या शरीराचे तापमान आणि रंग देखील नियंत्रित करतात. प्रत्येक भावना काहीतरी व्यक्त करत असते, स्वत:चा वेगळा रंग दाखवून देते. रागाने लालबूंद झाल्याचे आपण म्हणत असतो, तर लाजून गुलाबी किंवा लाल झाल्याचे म्हणत असतो.

Advertisement

शरीरात भावनांमुळे येणारे बदल देश, शहर, हवामान आणि पर्यावरणानुसार बदलत असतात. भारतात संतापात कुणी लाल होत असेल तर त्याच स्थितीत आर्क्टिकमध्ये राहणाऱ्या माणसासोबत असेच घडेल असे नाही. परंतु भावनांमुळे होणारे शारीरिक बदल आणि सेंसेशन पूर्ण जगात जवळपास एकसारखे असतात.

वैज्ञानिकांनी अलिकडेच एक असेच संशोधन केले आहे. भविष्यात याच रंग आणि तापमानांच्या आधारावर भावनांशी संबंधित मानसिक आजार बरे करता येणार आहेत. हे अध्ययन अलिकडेच पीएनएएस नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. याकरता 5 प्रकारचे प्रयोग करण्यात आले असून यात 701 लोकांनी भाग घेतला आहे.

वेगळ्या भावनांवर शारीरिक बदल वेगळे

या सर्व लोकांना वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागून त्यांना काही शब्द ऐकविण्यात आले, कहाण्या ऐकविण्यात आल्या, चित्रपट दाखविण्यात आला, मग त्यांना हे पाहत असताना तुमच्या शरीरातील कुठल्या हिस्स्यात कशाप्रकारचे सेंसेशन होत होते असे विचारण्यात आले. सर्व लोकांनी शरीरात कोणते बदल जाणवले हे सांगितले.

ज्या लोकांवर प्रयोग करण्यात आला, ते युरोप आणि आशियाचे होते. कशाप्रकारे भावना शरीराचा नकाशा बदलतो हे पाहिले गेले. जेव्हा तुम्ही पसंतीच्या व्यक्तीला भेटण्यास जात असता तेव्हा तुमची चाल अत्यंत हलकी असते. हृदय उत्सुकतेपोटी वेगाने धडकत असते, तर एंक्झाइटी म्हणजेच बैचैनीत तुमचे स्नायू आखडले जातात, हातांना घाम फूटू लागतो. असा प्रकार प्रामुख्याने नोकरीसाठी होणाऱ्या मुलाखतीवेळी होत असतो.

प्रत्येक हिस्स्याला सक्रीय करतात भावना

प्रत्येक भावना तुमच्या कार्डियोवस्कुलर आणि स्केलेटोमस्कूलर म्हणजेच हृदय, फुफ्फुस, स्नायू आणि हाडांवर जोर टागतात, याचबरोबर न्यूरोएंडोक्राइन आणि ऑटोनोमिक नर्व्हस सिस्टीमवर प्रभाव पाडतात, याचमुळे शरीर आणि भावनांदरम्यान ताळमेळ असतो.

हृदय तुटणे ही भावना

जेव्हा एखाद्या इसमाचा प्रेमभंग होतो, तेव्हा हृदय तुटते असे म्हटले जाते. ही एकप्रकारची भावना आहे. अशावेळी हृदय स्वत:चे काम करत असते, पूर्ण शरीरात रक्ताचा पुरवठा करते, केवळ वेग सामान्य स्थितीच्या तुलनेत काहीसा मंद किंवा अधिक होतो. स्वत:चे पसंतीचे गाणे ऐकल्यावर नृत्य करण्याचा किंवा शांततेत ऐकण्याचा विचार का मनात दाटतो यामागील उत्तर भावनाच आहे. प्रत्येक भावनेत तुमच्या शरीराचे तापमान आणि रंग बदलत असतो. भौगोलिक बदल झाल्यावर यात कशाप्रकारे बदल होतात यावर आता वैज्ञानिक अध्ययन करत आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article