कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

युरोपियन बुद्धिबळ स्पर्धेत बोधनाचा डंका

06:00 AM Dec 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

8 वर्षीय ब्रिटिश भारतीय बोधना शिवानंदन

Advertisement

वृत्तसंस्था /लंडन

Advertisement

नुकत्याच येथे झालेल्या युरोपियन बुद्धिबळ चॅम्पियन स्पर्धेत भारतीय वंशाची आठ वर्षीय युवा बुद्धिबळपटू बोधाना शिवानंदनने सर्वोत्तम ‘सुपर टॅलेंटेड’ सर्वोत्तम महिला बुद्धिबळपटूचा बहुमान मिळविला. भारतीय वंशाची ब्रिटनवासीय बोधना शिवानंदन व तिचे पालक ब्रिटनमध्ये स्थायिक झाले आहेत. लंडनमधील हॅरो येथे त्यांचे वास्तव्य आहे. क्रोएशियातील झाग्रेब येथे झालेल्या युरोपियन ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेचे बोधनाने अजिंक्यपद मिळविले. सदर स्पर्धा आठवडाभर चालू होती. या स्पर्धेत तिने आपली विजयी घोडदौड प्रत्येक डावात राखली होती. जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात चाणाक्ष समजल्या जाणाऱ्या काही आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटूंनाही पराभूत करण्याचा पराक्रम तिने या स्पर्धेत केला. 8 वर्षीय बोधना शिवानंदनने या स्पर्धेत 13 पैकी 8 गुण घेत अजिंक्यपद पटकावले. या कामगिरीमुळे बोधनाने 211.2 ब्लिट्झ एलो गुण घेत रोख रकमेचे बक्षीस मिळवल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली आहे. क्रोएशियात सदर स्पर्धा रविवारी समाप्त झाली होती. बोधनाला लहानपणापासूनच बुद्धिबळचे आकर्षण वाटत होते. तिला आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी आई वडिलांचे नेहमीच प्रोत्साहन लाभले. काही दिवसापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक यांनी आपल्या देशातील काही युवा बुद्धिबळपटूंना निमंत्रित केले होते. यामध्ये बोधना शिवानंदनचाही समावेश होता. ब्रिटनच्या शासनाने आपल्या देशामध्ये शालेय स्तरावर बुद्धिबळ या क्रीडा प्रकाराला अधिक प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. या नव्या योजनेनुसार देशातील काही सार्वजनिक ठिकाणी या खेळाकडे आकर्षित करण्यासाठी नव्याने किमान 100 बुद्धिबळ टेबलची स्थापना केली करण्यात येणार असून शंभर शाळांना 2000 ब्रिटिश पौंड्सची मदत दिली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article