महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

येमेनच्या समुद्रात बुडाली नौका, 49 ठार

06:44 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

140 जण बेपत्ता : 71 जणांना वाचविण्यास यश

Advertisement

वृत्तसंस्था/ सना

Advertisement

येमेनमध्ये एडनच्या किनाऱ्यानजीक शरणार्थींनी भरलेली एक नौका उलटली आहे. यामुळे नौकेतून प्रवास करणाऱ्या 49 जणांचा मृत्यू झाला तर 140 हून अधिक जण बेपत्ता झाले आहेत. नौकेतून 260 जण प्रवास करत होते आणि यात इथियोपिया आणि सोमालियाच्या नागरिकांचे प्रमाण अधिक होते.

हे शरणार्थी पूर्व आफ्रिकेतून  येमेनच्या दिशेने प्रवास करत होते. सोमालियातून मंगळवारी पहाटे 3 वाजता त्यांनी प्रवास सुरु केला होता, सोमालियापासून येमेन सुमारे 600 किलोमीटर अंतरावर आहे. नौका दुर्घटनेनंतर संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था इंटरनॅशनल ऑर्गनायजेशन फॉर मायग्रेशनने बचावमोहीम हाती घेतली, ज्यात 71 जणांना वाचविण्यास यश आले आहे. यातील 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. तर 31 महिलांसमवेत 6 मुलांचे मृतदेह हस्तगत झाले आहेत. बेपत्ता लोकांची संख्या अधिक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता संस्थेने व्यक्त केली आहे.

नौकेतून 115 सोमालियन आणि 145 इथियोपियन नागरिक प्रवास करत होते. ही नौका सोमालियाच्या बोसासो येथून रवाना झाली होती. दरवर्षी हजारो आफ्रिकन लोक सौदी अरेबियात पोहोचण्यासाठी लाल समुद्राद्वारे येमेनला ओलांडण्याचा प्रयत्न करतात.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article