For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुट्ट्यांमध्ये रक्त तुटवडा नेहमीचाच

08:30 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
सुट्ट्यांमध्ये रक्त तुटवडा नेहमीचाच
Advertisement

रक्तपुरवठ्याचं सगळं गणित रक्तसाठ्यावर अवलंबून असताना रक्ताच्या अतिरिक्त किंवा तुटीच्या साठ्यानुसारच निश्चिंतता येऊ शकते. ‘आयुष्यमान भव पंधरवड्यात रक्तदात्यांनी भरभऊन रक्तदान केले. त्यानंतर तीन महिन्यातच fिदवाळीच्या सुट्ट्या आल्या. दीर्घकालीन सुट्ट्या आल्यास रक्त तुटवडा भासतोच. तुटवडा आला की राज्य रक्त संक्रमण परिषदेकडेच टिकेचं बोट दाखवलं जातं. नेहमीच ते तितकंस खरं नसतंही... मात्र यावर रक्तदान कार्यक्रमाचे नियोजनबद्ध वेळापत्रक जबाबदार परिषदेने ठरवल्यास तुटवड्याचे चित्र टाळता येऊ शकते.

Advertisement

दिवाळीच्या सुट्टीत रक्तपेढ्यांमध्ये रक्त तुटवडा होत असल्याचे मुंबईत घटनांमधून दिसून आले. पहिल्या घटनेत केईएम ऊग्णालयातील एका ऊग्णाला ए पॉझिटीव्ह रक्ताची गरज होती. त्यांनी रक्तासाठी मुंबईतील रक्तपेढ्यांमध्ये विचारणा केली. मात्र रक्त उपलब्ध झाले नाही. तर दुसऱ्या प्रकरणात एका खासगी हॉस्पिटलमधील एका ऊग्णाला ए निगेटीव्ह रक्तगटाची गरज होती. त्यांना चार युनिट रक्त लागणार होते. मात्र विचारणा केल्यास एकही युनिटची पुर्तता होऊ शकली नाही. हे दोन्ही प्रसंग ऐन दिवाळीतील आहेत. दिवाळीत दीर्घकाळ सुट्टी असल्याने रक्तदाते शहराच्या बाहेर पडलेले असतात. दिवाळी तसेच मे महिन्यांच्या सुट्ट्यांमध्ये रक्त तुटवडा भासतोच. हे दरवर्षीचे चित्र आहे. अशात ऊग्णांची त्रेधा उडते. तर ऊग्णांच्या नातेवाईकांची रक्त शोधताना ससेहोलपट होत असते. जवळच्या रक्तपेढ्यांमध्ये तसेच ओळखीच्या रक्तपेढ्यांमध्ये सुट्ट्यांच्या दिवसात एखाद्या रक्तगटाचे रक्त मिळेलच याची खात्री दिली जात नाही. त्यामुळे बहुतांश ऊग्ण शस्त्रक्रिया दीर्घकालीन सुट्ट्या डावलून करत असल्याचे यापूर्वी कित्येक वेळा समोर आले आहे. दरम्यान राज्य रक्त संक्रमण परिषदेने रक्त पुरवठा तसेच साठा या बाबत रक्तपेढ्यांना कडक नियम आखून दिले आहेत. या नियमाने रक्तसाठा आणि रक्तपुरवठा केला जातो. रक्तपेढ्यांनी प्रक्रिया शुल्कापेक्षा जादा प्रक्रिया शुल्क आकारल्यास त्यांना आकारलेल्या शुल्काच्या पाच पट दंड ठोठावला जातो. यापैकी जादा आकारण्यात आलेले शुल्क ऊग्णास परत करण्यात येते. तर थॅलेसेमिया हिमोफिलिया सिकलसेल व रक्तांशी निगडीत इतर गंभीर आजारी ऊग्णांकडे मोफत रक्त ओळखपत्र असताना देखील अशा ऊग्णांना प्रक्रिया शुल्क आकारल्यास त्या शुल्काच्या तीन पट दंड कऊन यातील शुल्क संबंधित ऊग्णास परत करण्यात येते. तसेच रक्तपेढीत रक्त उपलब्ध असताना देखील थॅलेसेमिया हिमोफिलिया सिकलसेल गंभीर आजारी ऊग्णांना कोणतेही सबळ कारण नसताना रक्त पुरवठा न केल्यास प्रक्रिया शुल्क आणि एक हजार ऊपये दंड ठोठावण्यात येतो. रक्तपेढ्यांनी ई-रक्तकोष किंवा एसबीटीसी संकेत स्थळावर रक्तसाठा तसेच संबंधित माहिती न भरल्यास त्या रक्तपेढीला एक हजार ऊपये दंड करण्यात येतो. तर रक्तपेढीकडून माहिती अद्ययावत न केल्यास प्रति दिन पाचशे दंड आकारला जातो. शिवाय मार्गदर्शक तत्वांचे आणि नियमांचे वारंवार उल्लंघन केल्यास त्या रक्तपेढीचा परवाना रद्द केला जातो. हे सगळे असे शिस्तबद्ध असताना देखील रक्ताची वानवा असते. मात्र सुट्ट्यांच्या दिवसांत रक्त नसल्यास देणार कुठून असा प्रश्न रक्तपेढ्यांना सतावत असतो.

ऑक्टोबर, नोव्हेंबर ही दिवाळी सुट्टी तर उन्हाळी सुट्टी म्हणजे मे जून या कालावधीत नेहेमीच रक्त तुटवडा जाणवतो. त्यासाठीची रक्तपेढ्यांना लागणारी नियोजित तयारी दिसून येत नसल्याचा आरोप ऊग्णमित्रांकडून होत आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून रक्तदानाचे आवाहन केले जाते. मात्र हे फक्त आवाहनच असते. तुम्ही तुमच्या रक्त तुटवड्याचा प्रश्न रक्तदान शिबिरे घेऊन सोडवा अशा सूचना परिषदेकडून रक्तपेढ्यांना केल्या जातात. तसेच परिषदेचा रक्तदान प्रक्रियेत थेट सहभाग नसल्याचा आरोप होत आहे. परिषदेकडून रक्तदान शिबिरे भरवावीत अशी निव्वळ सूचना केली जाते. तर परिषदेकडून नेहमीच मनुष्यबळाची कमतरता तसेच कंत्राटी कर्मचारी असल्याने न टिकणारे कर्मचारी अशी मर्यादा असल्याचे सांगण्यात येते. रक्त पुरवठ्याचे विकेंद्रीकरण केल्यास तुटवडा भासणार नाही. काही ऊग्णालयांतील रक्तपेढ्या स्वत:च्या ऊग्णांसाठी रक्त राखून ठेवते. यात मात्र दुसऱ्या निकडीच्या ऊग्णाला सरकारी किंवा खासगी अशा कोणत्याही रक्तपेढीतून रक्त मिळत नाही. त्या ऊग्णांचा जीव टांगणीला लागतो. प्रत्येक रक्तपेढी रक्तदान शिबिर कधी घेणार याचे नियोजन ठरलेले नसल्याची टिका  होत आहे.

Advertisement

दरम्यान शहरातील रक्ततुटवडा होण्याचे कारण साजरा करण्यात आलेल्या आयुष्यमान भव पंधरवड्यात लपले असल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे महेंद्र केंद्रे यांच्याशी बोलण्यातून समोर आले. दिवाळी तसेच उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रक्तदाते त्यांच्या गावी जातात. अशावेळी सामाजिक संस्था तसेच आध्यात्मिक मंडळांकडून रक्तदान शिबिरांसाठी आवाहन केले जाते. मात्र नुकतेच 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राज्यात मोठ्या प्रमाणात रक्तदान झाले. यात एक लाख युनिट असा रक्त साठा जमा करण्यात आला असल्याचे केंद्रे यांनी स्पष्ट केले. आयुष्यमान भव हा पंधरवड्यात रक्तदान करण्यात आले. एकदा रक्तदान केल्यावर नियमानुसार तीन महिन्यापर्यंत रक्तदान कऊ शकत नाही. अशातच तीन महिन्याच्या आतच दिवाळीच्या सुट्ट्या आल्या. त्यातून हा रक्त तुटवडा जाणवत असल्याचे दिसून येत आहे. मात्र अशा विशेष पंधरवडे, लागून येणाऱ्या सुट्ट्यांच्या कालावधीत रक्तदानाचे नियोजन समजावले जाते. याहीवेळी परिषदेकडून तसे समजावण्यात आले. मात्र आयुष्यमान भव पंधरवड्यात रक्तदान करण्याबाबत आलेल्या राजकीय भारामुळे त्या काळात रेकॉर्डब्रेक रक्तदान झाले. आता दिसून येणारा रक्त तुटवडा त्याचे फलित आहे. अशा प्रसंगांना समोरे जाण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेपासून ते राज्यातील प्रत्येक रक्तपेढ्यांकडे नियोजनाची गरज आहे. रक्तदानासाठी नियोजित कार्यक्रम असल्यास रक्ताचा साठा समतोल राहिल. त्यासाठी रक्तदान शिबिरांचे वेळापत्रक मध्यवर्ती ठराव कऊन घ्यावा. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे रक्तदान शिबिरे तसेच पोलिस किंवा समाजातील रक्तदात्यांच्या रक्तदान शिबिर यांच्या वेगवेगळ्या वेळा ठरवाव्यात यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचे चलन सम प्रमाणात राहिल. अन्यथा दिर्घकालीन सुट्ट्यांमध्ये येणारा रक्ताचा तुटवडा हा नेहमीचेच दुखणे राहू शकते.

राम खांदारे

Advertisement

.