शिवसेना युवा सेनेतर्फे रक्तदान शिबिर
12:41 PM Nov 17, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : शिवसेना युवा सेनेच्यावतीने हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी रक्तदान शिबिराचे हे चौथे वर्ष आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन समाजोपयोगी उपक्रमांनी युवा सेना राबवित आहे. 36 हून अधिक जणांनी रक्तदान शिबिरात भाग घेऊन रक्तदान केले. महात्मा फुले रोड, शहापूर येथील दत्त मंदिरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. केएलई ब्लड बँकेतर्फे रक्त संकलन करण्यात आले. उपस्थित डॉक्टरांनी रक्तदानाविषयीचे गैरसमज दूर केले. यावेळी युवा सेनेचे विनायक हुलजी, मल्हारी पावशे, वैभव कामत, सोमनाथ सावंत, महेश मजुकर, गौरांग गेंजी, श्वेत तावनशेट्टी, अद्वैत चव्हाण-पाटील, विघ्नेश बडसकर, ओंकार बैलूरकर, उमेश गावडे, सक्षम कंग्राळकर, प्रणव बेळगावकर यासह इतर उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article