For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जितोतर्फे 15 ऑगस्ट रोजी महारक्तदान शिबिर

11:16 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
जितोतर्फे 15 ऑगस्ट रोजी महारक्तदान शिबिर
Advertisement

स्वातंत्र्यदिनानिमित्त उपक्रम : रक्तदात्यांना 1 लाखाचा अपघाती विमा 

Advertisement

बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्यावतीने (जितो) स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. गुरुवार दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत खानापूर रोड येथील महावीर भवन येथे शिबिर होणार आहे. यावर्षी 1200 हून अधिक रक्तदाते उपस्थित राहण्याचा अंदाज समन्वयक कुंतीनाथ कलमनी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. जितोकडून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. असाच उपक्रम तीन वर्षांपासून जितो बेळगावमध्ये राबवित आहे. नागरिकांना रक्ताची कमतरता पडू नये, यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. एक युनिट रक्तामुळे तिघा जणांचा जीव वाचू शकतो. मागील तीन वर्षांत अनेक गरजूंना रक्तपुरवठा करून त्यांचा जीव वाचविण्यात जितोला यश आले आहे. यावर्षीही रक्तदात्यांना न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीकडून एक लाख रुपयांचा अपघात विमा दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. मागील वर्षी 800 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. यावर्षी अधिकाधिक रक्तदात्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जनजागृती केली जात असल्याचे चेअरमन वीरधवन उपाध्ये यांनी सांगितले. यावेळी सेक्रेटरी अशोक कटारिया, सदस्य हर्षवर्धन इंचल, अभय आदिमनी, केएलई ब्लड बँकेचे डॉ. श्रीकांत विरगी व जितो सदस्य उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.