प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त चव्हाट गल्लीत रक्तदान शिबिर
11:01 AM Jan 23, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त चव्हाट गल्ली येथील युवक मंडळाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाने रक्तदान शिबिरासारखा सामाजिक उपक्रम राबवून एक वेगळेपण दाखवून दिले. या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. चव्हाट गल्ली मंडळाच्यावतीने चव्हाटा मंदिर येथे सामूहिक आरती करण्यात आली. याबरोबरच चव्हाट गल्ली परिसरात दोन हजार लाडूंच्या डब्यांचे वितरण करण्यात आले. अनिल बेनके यांनी युवक मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. रक्तदानामुळे राम मंदिरसारख्या धार्मिक सोहळ्यावेळीही सामाजिक धागा जपण्याचे काम या मंडळाने केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी चव्हाट गल्ली परिसरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article