For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बसचालकावर एअरगन रोखणारा गजाआड

10:33 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
बसचालकावर एअरगन रोखणारा गजाआड
Advertisement

बेळगाव : किरकोळ वादावादीनंतर एका कारचालकाने परिवहन मंडळाच्या बसचालकावर एअरगन रोखल्याची घटना गुरुवारी दुपारी नेहरुनगर येथील आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निक क्रॉसजवळ घडली आहे. एअरगन रोखणाऱ्या कारचालकाला माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. बसचालक मल्लिकार्जुन चंद्राप्पा अंकली, रा. चुळकी, ता. सौंदत्ती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आझमनगर येथील महम्मदशरीफ बादशाह मुल्ला याच्यावर भादंवि 323, 341, 504, 506, 353 व भारतीय शस्त्रास्त्र कायदा 28 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी महम्मदशरीफला अटक केली असून केए 22 एमडी 7773 क्रमांकाची कार व एअरगन जप्त केली आहे. गुरुवार दि. 21 मार्च रोजी दुपारी 12 वाजता ही घटना घडली आहे. बसचालक मल्लिकार्जुन हे बस चालवत होते. त्यावेळी महम्मदशरीफने हातवारे करीत बस व्यवस्थित चालव, असे सांगितले. महम्मदशरीफच्या हातवाऱ्यानंतर बसचालक मल्लिकार्जुन यांनीही तू कार व्यवस्थित चालव, असे सांगत त्याला हातवारे केले. त्यामुळे दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. वादावादीनंतर बसचालकाचा शर्ट पकडून त्याला धक्काबुक्की करण्यात आली. अर्वाच्च शिवीगाळ करीत महम्मदशरीफने आपल्या कारमध्ये ठेवलेली एअरगन काढून ती बसचालकावर रोखली. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी महम्मदशरीफला अटक करून न्यायालयासमोर हजर केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.