कर्नाटक पोलिसांकडून राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी
10:57 AM Dec 09, 2024 IST
|
Pooja Marathe
Advertisement
अधिवेशन व म. ए. समितीच्या महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
कोल्हापूर
बेळगाव येथे सोमवार (दि.9) पासून (दि. 19) पर्यंत राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव येथे महामेळाव्याचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील नेतेमंडळी मेळाव्यासाठी बेळगावकडे जातात. या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे काळात जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचनेच्या आधारे ज्या त्या वेळी आवश्यक त्या उपाययोजना करून कार्यवाही केली जाणार आहे. निपाणी पोलिसांच्या वतीने कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या कागल येथील दूधगंगा नदीवर नाकाबंदी केली आहे.
रविवारपासून सीमेवर जादा पोलिस मागवून नाकाबंदीची कार्यवाही सुरू केली असून महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या चारचाकी वाहनधारकांची चौकशी करून सोडण्यात येत आहेत.
सोमवार दि. 9 रोजी उद्धव ठाकरे गट शिवसेना यांच्या वतीने कर्नाटक शासनाला निवेदन देण्यासाठी महाराष्ट्रातून बेळगाव येथे अधिवेशन मध्ये जाणार आहेत. कर्नाटक प्रशासनाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित रहावा यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Advertisement
Advertisement
Next Article