तोडणी कार्यक्रमाप्रमाणे ऊस न्या ! अन्यथा रास्ता रोको : ऊस उत्पादकांचा राजाराम कारखान्याला इशारा
कसबा बावडा प्रतिनिधी
येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याने ऊस तोडणी कार्यक्रमाप्रमाणे शेतक्रयांचा ऊस वेळेत न्यावा अन्यथा येत्या 8 दिवसात रास्ता रोको करून कारखाना बंद पाडू असा इशारा काही ऊस उत्पादक शेतक्रयांनी छत्रपती राजाराम सहकारी कारखाना प्रशासनास दिला. यावेळी शेतकरी सभासदांनी विविध प्रश्न उपस्थित करून कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस व संचालक दिलीप उलपे यांना धारेवर धरले.
चालू हंगामातील नोंदणी केलेल्या उसाची तोड ऊस नोंदणी कार्यक्रमाप्रमाणे व्हावी या मागणीसाठी ऊस उत्पादक सभासदांनी मंगळवारी कारखाना कार्यस्थळावर कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांची भेट घेतली. यावेळी ऊस तोडणी कार्यक्रमाप्रमाणे आमचा ऊस का नेला जात नाही? राजकीय आकसापोटी ऊस तोडणार नाही का? जर आमचा ऊस राजाराम कारखान्याला घ्यायचाच नसेल तर तसे लेखी लिहून द्या, आम्ही आमचा ऊस अन्य कारखान्यास देतो. तुम्हाला कारखाना चालवायचा आहे की बंद करायचा आहे? असे अनेक प्रश्न विचारत सभासदांनी चिटणीस यांना धारेवर धरले. एक तासाच्या शाब्दिक चकमकीनंतर सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देत ऊस तोडणी कार्यक्रमाप्रमाणेच आपल्या ऊसाला तोड दिली जाईल अशी ग्वाही चिटणीस यांनी दिली. यावेळी दिनकर पाटील - वाशी, राजू बेनाडे - रुई, प्रमोद सूर्यवंशी - खोची, दिलीप पाटील - टोप, बाजीराव पाटील - शिये, बळवंत गायकवाड - आळते, रघुनाथ चव्हाण - कांडगाव, दगडू चौगले - धामोड, मोहन सालपे, संदीप नेजदार, अनंत पाटील, मिलिंद पाटील - कसबा बावडा आदी सभासद हजर होते.
आमचा ऊस लवकर तोडायचा नाही असा आदेश जर कारखान्याने दिला नसेल तर मग तसे सांगण्राया संबंधित कर्मच्रायाला पायताणाने हाणू असा इशारा कांडगाव चे सभासद शेतकरी दिगंबर मेडसिंगे यांनी दिला.
ऊस दर आंदोलनामुळे महिनाभर लांबलेल्या गळीत हंगामामुळे 40 टक्के ऊसतोड मजूर परत आपल्या गावी गेले. ते परत आलेच नाही. परिणामी अप्रुया मजुरांमुळे ऊस तोडणी कार्यक्रमानुसार शेतक्रयांचा ऊस आणण्यास विलंब होत आहे. येत्या 8 दिवसात हा प्रश्न निकालात काढून तोडणी कार्यक्रमाप्रमाणे ऊस तोड देण्यात येईल.
प्रकाश चिटणीस- कार्यकारी संचालक