महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

खानापुरात पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात रास्ता रोको

10:55 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खानापूर : राज्य सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ केल्याने त्या विरोधात निषेधासाठी व वाढीव दर तात्काळ मागे घ्यावेत व शक्ती योजना आणि वाढीव मुद्रांक शुल्क कमी करावे या मागणीसाठी खानापूर भाजपतर्फे गुरुवारी शिवस्मारक येथे आंदोलन केले. यावेळी मानवी साखळी केल्याने वाहतूक कोंडी झाली. यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून राज्य सरकारविरुद्ध घोषणा देत शिवस्मारक चौकात मोर्चा आल्यानंतर मानवी साखळी करून रास्ता रोको केला. यामुळे चारही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जवळपास अर्धा तास वाहतूक कोंडी झाल्यानंतर रास्ता रोको थांबवून तहसीलदार कार्यालयाकडे मोर्चा वळविण्यात आला.

Advertisement

यावेळी राज्यपालांना तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्यामार्फत निवेदन दिले. त्यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, राज्यांमध्ये हमी योजना जाहीर केली आहे. मात्र एका हाताने देत, दुसऱ्या हाताने घेत आहे. जनतेची दिशाभूल थांबवावी व दरवाढ कमी करावा. संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, धनश्री सरदेसाई व मान्यवरांची भाषणे झाली. प्रमोद कोचेरी, बसवराज सानिकोप, संजय कुबल, सुरेश देसाई, पंडित ओगले, संजय कंची, गुंडू तोपीनकट्टी, मल्लाप्पा मारिहाळ, चांगाप्पा निलजकरसह तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article