अंध महिला क्रिकेट संघातील खेळाडूंना सरकारी नोकरी, 10 लाखांचे बक्षीस
11:05 AM Nov 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : भारतीय अंध महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्याबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अभिनंदन केले तसेच कर्नाटकच्या क्रिकेटपटूंना सरकारी नोकरीसह प्रत्येकी 10 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कावेरी निवासस्थानी क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूचे वैयक्तिक अभिनंदन आणि सत्कार केल्यानंतर ही घोषणा केली.भारतीय संघातील इतर राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघातील 13 खेळाडूंनाही प्रत्येकी 2 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. मूळच्या तुमकूर येथील रहिवासी क्रिकेट संघाची कर्णधार दीपिकाच्या नेतृत्वाची आणि खेळण्याच्या शैलीची विशेष प्रशंसा केली. डॉ. एच. सी. महादेवप्पा आणि उच्च शिक्षणमंत्री एम. सी. सुधाकर आणि मुख्यमंत्र्यांचे प्रसार माध्यम सल्लागार के. व्ही. प्रभाकर उपस्थित होते.
Advertisement
Advertisement