For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छत्तीसगडमध्ये गनपावडर कारखान्यात स्फोट

06:35 AM May 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
छत्तीसगडमध्ये गनपावडर कारखान्यात स्फोट
Advertisement

इमारत उद्ध्वस्त : एकाचा मृत्यू, 10 गंभीर जखमींना रायपूर एम्समध्ये दाखल, काही कामगार गाडल्याची भीती

Advertisement

वृत्तसंस्था/ रायपूर

छत्तीसगडमधील बेमेटारा येथील गनपावडर कारखान्यात शनिवारी भीषण स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला असून सदर इमारत उद्ध्वस्त झाली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असले तरी गंभीर जखमींची संख्या 10 च्या वर असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही कामगार अडकल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. सुरुवातीला मृतांचा आकडा नऊ असल्याचे सांगण्यात आले. मात्र, सरकारी सूत्रांकडून अद्याप त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

Advertisement

या भीषण दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अपघाताच्या वेळी गनपावडर पॅक्टरीत जवळपास 100 कर्मचारी उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे. कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला. काळ्या धुराचे लोट आकाशात उठताना दिसत होते. प्रशासनाकडून सध्या कारखान्यात स्फोट नेमका कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे पथकही घटनास्थळी पोहोचले. ही संपूर्ण घटना बेमेटारा येथील बेरला ब्लॉकमधील बोरसी गावाजवळ घडली. कारखान्यातील भीषण स्फोटानंतर अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना तातडीने रायपूर एम्समध्ये दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच रायपूर आणि दुर्ग येथून अग्निशमन दलाच्या गाड्या आणि एसडीआरएफ बचाव पथके दाखल झाली. रायपूर येथून अग्निशमन दलाचे एक आणि दुर्ग येथून दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. रायपूर येथून 20 सदस्यीय एसडीआरएफ बचाव पथक पोहोचल्यानंतर मदतकार्याला गती आली होती.

उपमुख्यमंत्र्यांची घटनास्थळी धाव

बेमेटारा येथील कारखान्यात झालेल्या स्फोटानंतर उपमुख्यमंत्री अऊण साओ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आढावा घेतला. बोर्सी येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. मी प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. मदत आणि बचावकार्य सुरू झाले आहे. प्रशासनाचे पथक घटनास्थळी हजर असून जवळपासच्या जिह्यांतूनही अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची शक्मयता आहे. बचाव मोहिमेनंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. सध्या संपूर्ण प्रशासन एकत्र काम करत आहे, असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.