For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोडसेवाडी येथील ब्लॅकस्पॉट हटविला

10:06 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोडसेवाडी येथील ब्लॅकस्पॉट हटविला
Advertisement

बेळगाव : शहरामध्ये ब्लॅकस्पॉटची संख्या वाढली आहे. मध्यंतरी ब्लॅकस्पॉट दूर करण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने मोहीम राबविण्यात आली होती. मात्र ती खंडित पडली होती. आता पुन्हा गोडसेवाडी येथील ब्लॅकस्पॉट हटविण्यात आला असून, शहरातील इतर ठिकाणचेही ब्लॅकस्पॉट हटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. गोडसेवाडी येथील सर्कलमध्ये कचरा फेकण्यात येत होता. त्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडत होते. त्या परिसरात जनावरांचा व भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला होता. त्यामुळे तो ब्लॅकस्पॉट हटविण्याची गरज निर्माण झाली होती. उपमहापौर आनंद चव्हाण यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ब्लॅकस्पॉट हटविण्याची सूचना केली. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी तेथील ब्लॅकस्पॉट हटविला. ब्लॅकस्पॉट हटवून त्या ठिकाणी फुलांची रांगोळी काढण्यात आली. यावेळी उपमहापौर आनंद चव्हाण, महानगरपालिकेचे पर्यावरण विभागाचे साहाय्यक अभियंते हणमंत कलादगी यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.