तुमच्या काळ्या जीन्सचा रंग फिका पडलाय ?मग हि ट्रीक वापरून मिळेल नव्यासारखी जीन्स
प्रत्येकाच्या कपड्यांच्या कलेक्शन मध्ये काळी जीन्स असतेच.कोणत्याही लुकसोबत काळी जीन्स परफेक्ट जाते. पण कितीही ब्रॅंडेड जीन्स घेतली तरी एकावेळेनंतर ती पांढरी दिसायला लागते.आणि लोकल मार्केट मधून खरेदी केल्यास दोनवेळच्या धुण्यातच त्या पॅन्टचा कलर उडून जातो. या प्रॉब्लेम वर खूप सोप्पा आणि एकदम स्वस्त उपाय म्हणजे जीन्सला डाय करणं आणि तेही कोणाकडे बाहेर जाऊन नाही तर घरच्या घरी. चला तर मग पाहुयात याच्या स्टेप्स.
सर्वात आधी एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा. नंतर त्यात ४ चमचे मीठ टाका. पाणी उकळलं की ते एका बादलीत काढून घ्या. ही बादली शक्यतोवर जुनी घ्या, कारण काळा रंग बादलीला राहू शकतो. त्यात आता फक्त पाच रुपयाला येणारी काळ्या रंगाची कपडे डाय करण्याची पुडी टाका. ही पुडी तुम्हाला किराणा दुकानात किंवा कटलरीच्या दुकानात मिळेल.आता एका काठीच्या मदतीने पूर्ण पाणी नीट ढवळून घ्या अन् त्यात आपली जीन्स टाका. ही जीन्स पण काठीने पूर्ण भिजवून घ्या. अर्धा पाऊण तासाने पाणी थोडं कोमट झालं की जीन्स आपल्या हाताने जरा फिरवून व्यवस्थित भिजवून घ्या. यानंतर जीन्स रात्रभर किंवा ४-५ तास तशीच पाण्यात ठेवा. आता जीन्स त्या पाण्यातून काढून स्वच्छ पिळून घ्या आणि वाळवा. तुमची जुनी जीन्स अगदी नव्या दिसेल.
(टीप- वरील बातमी ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.)