तीन कराटेपटूंना ब्लॅक बेल्ट
बेळगाव : सप्तपदी मंगल कार्यालय मच्छे येथे कराटेची बेल्ट परीक्षा पार पडली. या परीक्षेत एकूण 102 स्पर्धकांनी भाग घेतला होता. टॉप तीन ब्लॅक बेल्ट विद्यार्थी वैभव कणबरकर, प्रणाली कणबरकर आणि रोहित चौगुले हे तिन्ही विद्यार्थी गेल्या 8 वर्षापासून मच्छे येथील कराटे क्लासमध्ये सतत सराव करीत होते. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होऊन विविध ठिकाणी पदके मिळवली. इंडियन कराटे क्लब व बेळगांव जिल्हा स्पोर्ट्स कराटे संघटनेचे अध्यक्ष गजेन्द्र काकतीकर यांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट, प्रमाणपत्र आणि स्मुर्तीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या पालकांना सुद्धा शाल, श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. वरील तिन्ही ब्लॅक बेल्ट विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक निलेश गुरखा यांचे प्रशिक्षण लाभत आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्रीरामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडूसकर, कपिल भोसले, डॉ. पद्मराज पाटील, डॉ. विद्या पद्मराज पाटील, गजेंद्र काकतीकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी कण्यासाठी इंडियन कराटे क्लबच्या लेडी चीफ इंस्ट्रक्टर हेमलता काकतीकर व प्रशिक्षक प्रभाकर किल्लेकर, विठ्ठल भोजगार, परशुराम काकती, विजय सुतार, हरीष सोनार, नताशा अष्टेकर, रतिक लाड, परशुराम नेकणार, कृष्णा देवगाडी, सौरभ मजुकर, सुनिधी कणबरकर, संजना शिंदे, सिद्धांत करडी, आदित्यराज यादव, कृष्णा जाधव, अनुज कोली, सिद्दिका देवलापुर आणि जयकुमार मिश्रा यांनी विशेष परिश्रम घेतले.