महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जीबीएस कराटे अकादमीच्या तीन खेळाडूंना ब्लॅक बेल्ट

10:30 AM May 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : उडपी येथे कराटे बुडोकॉन आंतरराष्ट्रीय संघटना आयोजित ब्लॅक बेल्ट परीक्षेत बेळगावच्या जीबीएस स्पोर्ट्स कराटे अकादमीच्या तीन खेळाडूंना उत्तीर्ण होऊन त्याना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला. उडपी येथील मथुरा सभागृहात घेण्यात आलेल्या ब्लॅक बेल्ट परीक्षेत जवळपास 80 कराटे पटुनी भाग घेतला होता. त्यामध्ये बेळगावच्या स्पोर्ट्स अकादमीच्या कराटेपटु सोहन घाटेगस्ती, कृष्णा नंदी व राज हन्नीकेरी यानी परीक्षेत उत्तीर्ण होऊन ब्लॅक बेल्ट पटकाविला. सदर परीक्षा हैदराबादचे प्रमुख प्रशिक्षक बी परमेश यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यावेळी प्रमुख इन्स्पेक्टर म्हणून महाऊद्र यमी हे उपस्थित होते. वरील तिन्ही खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट देऊन गौरविण्यात आले. या तिन्ही खेळाडूंना कराटे मास्टर्स महाऊद्रा यमी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article