For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मध्यप्रदेशात भाजपचाच डंका

06:46 AM Jun 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
मध्यप्रदेशात भाजपचाच डंका
Advertisement

ज्योतीरादित्य सिंधीया हे गुणा, शिवराज सिंग चौहान विदीशा, फगन सिंग कुलस्ते हे मंडला, शंकर लालवाणी हे इंदोर, व्ही. डी. शर्मा हे खजुराओ, संध्या राय या भिंडमधून, लता वानखेडे सागरमधून, विरेंद्र कुमार टिकमगडमधून, अलोक शर्मा भोपाळ, रोडमल नागर राजगडमधून निवडणूक लढवत आहेत. राखीव मतदारसंघ खरगोणमधून भाजपने दुसऱ्यांदा विजय प्राप्त केला असून गजेंद्र पटेल यांनी बाजी मारली आहे. सागरमध्ये भाजपच्या लता वानखेडे मोठ्या मतफरकाने विजयी झाल्या आहेत. लता वानखेडेंना 7 लाख 84 हजार 953 मते तर विरोधात काँग्रेसचे चंद्रभुषण बुंदेला यांना 3 लाख 15 हजार 870 मते मिळाली, यायोगे लता या 4 लाख 69 हजार मतांनी विजयी झाल्या. उज्जैनमधून भाजपचे अनिल फिरोजिया यांनी मोठी आघाडी घेतली आहे. टीकमगडमधूनही भाजपचे डॉ. विरेंद्र कुमार 4 लाख मताधिक्यांनी विजयी झाले. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमुळे विजय शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी गुणामधून ऐतिहासिक 5 लाख  मताधिक्यांनी विजय प्राप्त केला. सिंधीयांना 8 लाख 80 हजार 666 मते मिळाली तर काँग्रेसचे यादवेंद्र सिंग यादव यांना 3 लाख 68 हजार 02 मते मिळाली. दमोहमधून भाजपचे राहुल सिंह लोधी विजयी झाले आहेत.  राज्याचे माजी मुख्यमंत्री व वरिष्ठ काँग्रेस नेते दिग्वीजय सिंग हे राजगढमधून पिछाडीवर आहेत. छिंदवाडातून काँग्रेसचे विद्यमान खासदार नकुल नाथ हे पिछाडीवर आहेत. याठिकाणी भाजपचे विवेक बंटी साहू हे आघाडीवर आहेत. नकुल नाथ हे कमल नाथ यांचे पुत्र आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते शिवराज सिंग चौहान हे विदिशातून निवडून आले आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.