महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ भाजपचे राज्यव्यापी आंदोलन

06:33 AM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

राज्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी भाजपने राज्यभरात आंदोलन केले. शनिवारी राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील विक्री करात वाढ केली होती. त्यामुळे भाजप, निजदसह विविध संघटनांनी दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. सोमवारी सर्व जिल्हा केंद्रांमध्ये पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात भाजप नेते व कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलन सुरुच राहिल, असा इशारा भाजपने दिला आहे.

Advertisement

बेंगळूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करून दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. फ्रीडम पार्कवरील आंदोलनात भाजपचे अनेक आमदार, खासदार, नेते व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीही करण्यात आली.

राज्यातील काँग्रेस सरकार जनविरोधी असून पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांना फटका बसणार आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या किमती वाढण्यासही कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

बेंगळूरमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न भाजप नेते व कार्यकर्त्यांनी केला. बैलगाडीतून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी निघालेल्य भाजप नेत्यांना पोलिसांनी वाटेत अडवून ताब्यात घेतले.

जनविरोधी सरकार : विजयेंद्र

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलनात सहभागी होण्यापूर्वी बेंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले, राज्यातील काँग्रेस सरकार हे जनविरोधी सरकार आहे. इंधन दरवाढ सर्वसामान्यांवर बोजा ठरत आहे. त्यामुळे सिद्धरामय्या यांनी दरवाढ मागे घ्यावी. अन्यथा आंदोलन सुरूच राहिल. सिद्धरामय्या यांनी इतर राज्यांतील पेट्रोल-डिझेल दराशी तुलना केली आहे, ही बाब समर्थनीय नाही. काँग्रेसचे आमदार नाडगौडा यांनी विकासकामांसाठी अनुदान नसल्याचे सांगितले होते. ही बाब सरकारच्या बेफिकीर प्रशासनाचा ठोस पुरावा आहे. मागील वर्षभरापासून राज्याची आर्थिक स्थिती कोलमडत आहेत, अशी टीका विजयेंद्र यांनी केली.

शिमोग्यात आंदोलनात सहभागी भाजप नेत्याचे निधन

शिमोग्यातील नेते आणि विधानपरिषदेचे माजी सदस्य एम. बी. भानूप्रकाश (वय 69) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सोमवारी भाजपच्या वतीने पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आयोजिलेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. आंदोलनानंतर रामभजनमध्ये ते सहभागी झाले. नंतर कारमध्ये बसताना अचानक त्यांच्या छातीत वेदना जाणवू लागल्या. त्यांना तातडीने मॅक्स इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराचा उपयोग न झाल्याने त्यांचे निधन झाले. ते रा. स्व. संघाचे सक्रिय कार्यकर्ते होते. 2013 मध्ये ते विधानपरिषद सदस्य बनले होते.

 आज निजदचे आंदोलन

राज्यातील पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ मंगळवारी निधर्मी जनता दलाने (निजद) आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी 11 वाजता बेंगळूरच्या फ्रीडम पार्कवर निजद नेते आंदोलन करणार असून इंधन दरवाढीच्या

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article