भाजपाचे पुन्हा धक्कातंत्र?
फडणवीस नाहीतर मग कोण? : रात्री उशिरा महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक
मुंबई : भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्याशी बुधवारी रात्री उशिरा चर्चा केली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केल्यास राज्यातील राजकारणाची दिशा काय असेल, त्याचा राज्यात काय संदेश जाईल याची तसेच दुसरीकडे बिगर मराठा चेहरा दिल्यास त्याचे काय पडसाद उमटतील याची पण चर्चा झाल्याचे समजते. यामुळे भाजप पुन्हा एकदा अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही मुख्यमंत्रिपदाचा नवा चेहरा देत धक्कातंत्र देणार का? असे तर्कविर्तक राज्याच्या राजकारणात लावले जात असून मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स आणखी वाढला आहे. यामुळे गुरुवारी रात्री उशीरा दिल्लीत होणाऱ्या महायुती व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमधून या साऱ्या प्रश्नांची उत्तरे समोर येणार आहेत.
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होऊनही स्पष्ट बहुमत असतानाही महायुती आणि विशेषत: भाजप त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अद्यापही जाहीर करू शकली नाही. त्यामागे दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे या निवडणुकीत महायुतीचे मोठ्या संख्येने निवडून आलेले आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या अपार मेहनतीचे फळ आहे. त्यामुळे त्यांना संधी देण्यात यावी, असा मतप्रवाह आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात मागील वर्षभरापासून मराठ्यांचे आंदोलन घोंगावत आहे. ते शांत करण्यासाठी मराठा चेहराच मुख्यमंत्रिपदी बसवावा यासाठी भाजप श्रेष्ठी प्रयत्नशील आहेत.
कोणीही मुख्यमंत्री झाला तरी मराठ्यांचे आंदोलन पुन्हा नव्याने सुरू करणार असल्याची दवंडी मनोज जरांगे यांनी दिली आहे. मनोज जारांगे यांनी फडणवीसांबाबत मराठ्यांत प्रतिकूल मत तयार केले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास त्यांना मराठ्यांचे आंदोलन त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी मुख्यमंत्रिपदी मराठा चेहरा देता येईल का, याचाही विचार भाजप श्रेष्ठी करत आहेत.
राज्यात गेल्या वर्षीच्या सप्टेंबरपासून मराठा आंदोलन अधिक तीव्र झाले. मनोज जरांगे यांच्या नेतफत्वात आरक्षणाची लढाई गाजली. त्यांच्या उपोषणामुळे सरकारने अनेकदा नमते घेतले. तरीही मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरील रोष कमी झाला नाही. त्यांनी आता सुद्धा सरकार स्थापन झाल्यानंतर मराठा आरक्षणासाठी सामूहिक उपोषणाचा एल्गार दिला आहे. राज्यात ओबीसी आणि मराठा यांच्यातील दरी कमी करण्याचे काम काही नेत्यांनी केले आहे. काही नेते आजही सर्वसमावेशक आहेत. ते ओबीसी आणि मराठा समाजासह सर्वांसाठी अनुकूल असे राहणार असल्याचे चित्र आहे.
तऊणांना संधी
मंत्रिमंडळासाठी भाजपने मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी नवीन नियम तयार केले आहेत. त्यामुळे या एक ज्येष्ठ सदस्यांच्या इच्छेवर पाणी फेरले जाणार असून तऊणांना मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे. ज्येष्ठांनी त्यांना मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहायचे आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचार करताना पेंद्रीय मंत्री अमित शाह यांनी यावेळी महायुती मोठ्या संख्येने निवडून येण्याचे भाकित व्यक्त केले होते. त्याचवेळी त्यांनी 2029 मध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचेही म्हटले होते. त्याची सुऊवात आतापासूनच भाजप सुरू करणार आहे. मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यात भाजपचे 20 मंत्री असणार आहेत. नवीन मंत्रिमंडळात भारतीय जनता पक्ष युवा आमदारांना संधी देणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ आमदार आणि शिंदे सरकारमधील काही जणांना डच्चू मिळणार असल्याचे संकेत मिळत आहे.
म्हणजे शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला असे नाही : उदय सामंतांची गुगली
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गफहमंत्री अमित शहा हे मुख्यमंत्रिपदाचा अंतिम निर्णय सांगतील तो मान्य असेल, असे शिंदे म्हणाले. मात्र याचा अर्थ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला असा होत नाही असे विधान शिंदे शिवसेनेच्या उदय सामंत यांनी केले. सामंतांच्या गुगली वाक्याने भाजपाच्या गोटात धडकी भरल्याचे चित्र निर्माण झाले. तर गुऊवारी रात्री शिंदे दिल्लीतील भाजपाच्या प्रमुखांना भेटायला गेल्याने यात अधिक संभ्रम झाला आहे.
केंद्रात जाऊ नका; उपमुख्यमंत्रिपद घ्या ..; सेनेच्या माजी मंत्री आणि आमदारांची काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आग्रह
तुम्ही सरकारमध्ये या, उपमुख्यमंत्रिपद स्वीकारा, अशी मागणी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या माजी मंत्र्यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी त्याच्या विश्वासू मंत्र्यांपैकी माजी मंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील,शंभुराज देसाई,आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले यांच्यासोबत चर्चा केली . भाजपने उपमुख्यमंत्रिपद दिल्यास ते स्वीकारा अशी विंनती एकनाथ शिंदे यांनी त्याच्या विश्वासू मंत्र्यांपैकी माजी मंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील,शंभुराज देसाई,आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले यांनी शिंदे यांची ठाण्यात निवासस्थानी भेट घेऊन केली. एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाण्यापूर्वीही हे सर्व नेते त्यांच्या भेटीला पोहोचले होते.