For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारवार नगराध्यक्षपदी भाजपचे रवीराज अंकोलेकर

10:38 AM Aug 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
कारवार नगराध्यक्षपदी भाजपचे रवीराज अंकोलेकर
Advertisement

उपनगराध्यक्षपदी निजदच्या प्रिती मधुकर जोशी विजयी : काँग्रेस उमेदवारांचा पराभव

Advertisement

कारवार : बुधवारी येथे पार पडलेल्या कारवार नगरपालिका पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत भाजप आणि राज्यात भाजप मित्रपक्ष असलेल्या निजदने बाजी मारली. नगध्यक्षपदी भाजपचे रवीराज अंकोलेकर आणि उपनगराध्यक्षपदी निजदच्या प्रिती मधुकर जोशी निवडून आल्या. अंकोलेकर यांनी काँग्रेसच्या समर्थनावर अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रकाश नाईक यांचा 5 मतांनी पराभव केला. अंकोलेकर यांना 19 तर नाईक यांना 14 मते पडली. प्रिती जोशी यांनी काँग्रेसच्या स्नेहलता हरीकंत्र यांचा पाच मतांनी पराभव केला. जोशी यांना 19 मते तर पराभूत उमेदवार हरीकंत्र यांना 14 मते पडली.

नगराध्यक्षपद सामान्य गटासाठी तर उपनगराध्यक्षपद महिला सामान्य गटासाठी राखीव ठेवण्यात आले होते. कारवार नगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या 31 इतकी आहे. यापैकी प्रत्येकी 11 नगरसेवक भाजप आणि काँग्रेसकडून निवडून आले होते. उरलेल्या नगरसेवकांपैकी चार निजदचे आणि पाच अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेस आणि भाजपला पदाधिकारीपदी निवडून येण्याची समान संधी असल्याने निवडीबद्दल कमालीची चुरस निर्माण झाली होती. येथे गेले काही दिवस रिसॉर्ट राजकारणही रंगले होते. शेवटी भाजप आणि त्यांचा मित्रपक्ष असलेल्या निजदने भाजप-निजद, अपक्ष, खासदार विश्वेश्वर हेगडे, विधान परिषद सदस्य गणपती उळवेकर यांच्या मतदानांमुळे बाजी मारली. निवडणुकीच्यावेळी खासदार विश्वेश्वर हेगडे, विधानपरिषद सदस्य गणपती उळवेकर, कारवारच्या माजी आमदार आणि भाजपच्या राज्य उपाध्यक्षा रुपाली नाईक, कारवारचे माजी आमदार आणि विद्यमान मंत्री आनंद असनोटीकर, माजी नगराध्यक्ष डॉ. नितीन पिकळे आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.