महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची जय्यत तयारी सुरु

11:58 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजपच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक

Advertisement

पणजी : लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आत्तापासूनच वेग येत असून या पार्श्वभूमीवर काल सोमवारी भाजपच्या येथील मुख्यालयात लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित बैठक झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे केंद्रीय नेते आशिष सूद, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, सभापती रमेश तवडकर, पक्षाचे सरचिटणीस दामोदर नाईक, माजी मंत्री नीलेश काब्राल, बाबू कवळेकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर आणि कोअर कमिटीचे इतर सदस्य उपस्थित होते. बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत राज्यातील दोन्ही जागांवर यश मिळविण्यासाठी भाजपने उत्तर व दक्षिण गोव्याच्या जागेवर लक्ष केंद्रीत केले आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली. भाजपला विकासाच्या आधारावर लोकांचे पाठबळ मिळेल, अशा विश्वास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केला. बैठकीला उपस्थित राहिलेल्यांपैकी दिगंबर कामत, रमेश तवडकर, बाबू कवळेकर व नरेंद्र सावईकर या चार नेत्यांची दक्षिणेतील उमेदवारीसाठी नावे चर्चेत आहेत. परंतु नेमक्या एका नावावर अजूनही शिक्कामोर्तब झाले नसले तरी येत्या काही दिवसांतच त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article