For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपची जम्बो राज्य कार्यकारिणी

12:33 PM Jun 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
भाजपची जम्बो राज्य कार्यकारिणी
Advertisement

तीन वर्षांचा कार्यकाळ, 135 जणांचा समावेश : जुन्या कार्यकर्त्यांसह आमदार, मंत्र्यांना स्थान

Advertisement

पणजी : भाजप प्रदेशाध्यक्षपदी दामू नाईक यांची निवड झाल्यानंतर आता काल गुरुवारी संपूर्ण कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या निवडीस मंजुरी दिली आहे. वर्ष 2025 ते 2028 या तीन वर्षांच्या कालावधीसाठी ही समिती कार्यरत राहणार आहे. निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये पाच राज्य उपाध्यक्ष, दोन सरचिटणीस, पाच राज्य सचिव, दोन खजिनदार, मुख्य प्रवक्ता, माध्यम समन्वयक, समाजमाध्यम प्रमुख, आयटी प्रमुख, कार्यालय सचिव यांच्यासह कायमस्वरूपी निमंत्रक, खास निमंत्रक आणि उर्वरित सदस्य अशा एकूण 135 जणांचा समावेश   करण्यात आला आहे.

अध्यक्ष  : दामू नाईक, उपाध्यक्ष : दत्तप्रसाद खोलकर, अॅड नरेंद्र सावईकर, कुंदा चोडणकर, विश्वास सतरकर, ग्लेन सौझा टिकमलो, चंद्रकांत कवळेकर, सरचिटणीस : सिद्धार्थ कुंकळकर, सर्वानंद भगत, सचिव : दयानंद सोपटे, दीपक नाईक, आरती बांदोडकर, धाकू मडकईकर, संजना वेळीप, रानिया कार्दोजो, खजिनदार : संजीव देसाई यांची निवड करण्यात आली आहे.

Advertisement

सदस्य : संजना परब, मधुकला शिरोडकर, सुलेखा शेट्यो, सुवर्णा तेंडुलकर, दिलीप पऊळेकर, जास्मिन ब्रागांझा, सुलक्षणा सावंत, वासुदेव परब, चंद्रकांत गावस, सुभाष मळीक, सुभाष साळकर, भारती नाईक, मनुजा गावकर, रिचा देसाई, दयानंद मांद्रेकर, अनिता गावडे, मिलाग्रीना गोम्स, तनुजा पैगिणकर, केशव प्रभू, मनोज कोरगांवकर, क्लाफासियो डायस, गोविंद पर्वतकर, महानंद अस्नोडकर, सुरेश केपेकर, विशाल देसाई, समीर मांद्रेकर, मनोज मसुरकर, कृष्णा वेळीप, अऊण भट, सुदेश भिंगी, प्रदीप शेट, हेमांगी गोलतकर, प्रेमानंद म्हांबरे, साविया रॉड्रिगीश, दीपक बोरकर, संजय सातार्डेकर, रूपेश महात्मे, अंकिता नावेलकर, रोषन देसाई, जयंत जाधव, डिओना कोरगावकर, प्रवीण मणेरकर, रवींद्र राणे, सुखाजी नाईक, शिरीष देसाई, नारायण मांद्रेकर, सिद्धेश नाईक, संदीप बांदोडकर, शॉन मार्टिन्स, गोरख मांद्रेकर, शैला पार्सेकर, मेदिनी नाईक, गोपाळ सुर्लकर, रितेश नाईक, विलास देसाई, अनिता कवळेकर, सलिया गावस, दीपा पळ, मनोहर धारगळकर व उषा कुडाळकर.

कायमस्वरूपी निमंत्रक : डॉ. प्रमोद सावंत, श्रीपाद नाईक, सदानंद तानावडे, विनय तेंडुलकर, दिगंबर कामत, विश्वजित राणे, रवी नाईक, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, नीळकंठ हळर्णकर, गोविंद गावडे, आतानासियो मोन्सेरात, आलेक्स सिक्वेरा, मावीन गुदिन्हो, सुभाष फळदेसाई, प्रेमेंद्र शेट, केदार नाईक, उल्हास तुयेकर, कृष्णा साळकर, संकल्प आमोणकर, गणेश गांवकर, मायकल लोबो, जेनिफर मोन्सेरात, नीलेश काब्राल, देविया राणे, विनोद शिंदे, मनोहर आजगांवकर, नरहरी हळदणकर, फ्रान्सिस सिल्वेरा, राजेश पाटणेकर, मिलिंद नाईक, संदीप हरमलकर, राजीव सुखटणकर, पुंडलिक देसाई, शिरीष कामत, शुभम पार्सेकर, सुधीर पार्सेकर, यांचा समावेश आहे.

खास निमंत्रक : राजेश फळदेसाई, प्रवीण आर्लेकर, ऊडाल्फ फर्नांडीस, डिलायला लोबो, ज्योशुआ डिसोझा, राकेश अगरवाल, ऊपेश कामत, प्रभाकर गांवकर, दयानंद कारबोटकर, शर्मद रायतुरकर, उल्हास अस्नोडकर, डॉ. शेखर साळकर, गिरीश उस्कैकर, अॅड मनोहर आडपईकर, गजेंद्र राजापुरोहित, अॅड यतीश नाईक, गिरीराज वेर्णेकर, अँथनी बार्बोझा, उर्फान मुल्ला, शशिकांत गांवकर व बाबाजी सावंत यांचा समावेश करण्यात आला आहे.

अॅङ विश्वास सतरकर राज्य उपाध्यक्षपदी

प्रियोळ मतदारसंघातील निष्ठावान नेते, माजी आमदार, माजी सभापती यांना राज्य कार्यकारिणीवर उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. गोविंद गावडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आल्याच्या दुसऱ्याच दिवशी सतरकर यांची निवड जाहीर झाली आहे. या घटनेमुळे गावडे यांची प्रियोळात गोची होणार आहे.

Advertisement
Tags :

.