For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपची गोव्यावर वक्रदृष्टी

10:24 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजपची गोव्यावर वक्रदृष्टी
Advertisement

कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांचा आरोप : लोहिया मैदानावरून प्रचारास प्रारंभ

Advertisement

मडगाव : दक्षिण गोव्यातील जनता माझा विजय निश्चित करील. भाजपची वक्रदृष्टी दक्षिण गोव्यावर आहे. ज्यामुळे पर्यावरण, जंगल आणि वन्यजीवांचा नाश झाला आहे. भाजपला दाबोळी विमानतळ बंद करायचा असून गोव्यातील प्रत्येक इंच जमीन बळकावयाची आहे. आता गोव्याला भाजपपासून मुक्त करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार पॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी लोहिया मैदान, मडगाव येथे बोलताना केले. इंडिया आघाडीचे दक्षिण गोवा उमेदवार पॅप्टन विरियातो फर्नांडिस आणि उत्तर गोवा उमेदवार अॅड. रमाकांत खलप आणि इतर नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरूवात म्हणून काल मंगळवारी लोहिया मैदानावरील हुतात्मा स्मारक आणि डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्ता आणि अॅड. कालुस परेरा, काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रित सदस्य गिरीश चोडणकर, आपचे अध्यक्ष अमित पालेकर, आमदार पॅप्टन व्हेन्झी व्हिएगस आणि व्रुझ सिल्वा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जुझे फिलिप डिसोझा, गोवा फॉरवर्डचे प्रशांत नाईक, तृणमूल काँग्रेसचे समील वळवईकर, शिवसेनेचे जितेश कामत, माजी मंत्री एलिना साल्ढाणा, अॅड. प्रतिमा कुतिन्हो आणि इतर विविध विरोधी पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला सत्तेवरून कायमचे हटवून लोकाभिमुख सरकार स्थापन करण्यासाठी आजपासून क्रांती सुरू झाली आहे. गोवा आमच्या दोन्ही उमेदवारांना विजय मिळवून देईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केला. 18 जून 1946 मंगळवार होता. जेव्हा डॉ. राम मनोहर लोहिया आणि डॉ. ज्युलियाव मिनेझिस यांनी याच लोहिया मैदानातून गोवा क्रांती आंदोलन सुरू केले. आज मंगळवार आहे आणि आम्ही हुकूमशाही भाजप विरोधात क्रांती सुरू करण्यासाठी एकत्र आलो आहोत, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी यावेळी बोलताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मंत्री जुझे फिलीप डिसोझा म्हणाले की, विरोधक एकजूट असून भविष्यातही आमचे ऐक्मय कायम राहील. आपण प्रत्येक गोमंतकीयाला इंडियाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन करतो, असेही ते म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीची लढाई 100 कौरव आणि 5 पांडवांमधील आहे. आमच्याकडे उमेदवार म्हणून एक निवृत्त नौदल अधिकारी आहे. जो देशासाठी आपले बलिदान देण्यास तयार आहे असे गोवा फॉरवर्डचे प्रशांत नाईक म्हणाले. आपचे अध्यक्ष अमित पालेकर, शिवसेनेचे जितेश कामत, तृणमूल काँग्रेसचे समिल वळवईकर आणि इतरांनीही पॅप्टन विरियातो फर्नांडिस आणि अॅड. रमाकांत खलप यांना जाहिर पाठिंबा व्यक्त केला.

Advertisement

पिंपळकट्ट्यावर घेतले दामोदराचे दर्शन

नंतर दोन्ही उमेदवारांनी श्री पिंपळकट्टा येथे जाऊन देव दामोदराकडे प्रार्थना केली. दक्षिण गोव्याचे उमेदवार पॅप्टन विरियातो फर्नांडिस, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर आदींनी  न्यू मार्केटला भेट देऊन दुकानदार आणि विव्रेत्यांशीही संवाद साधला.

Advertisement
Tags :

.