For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लैंगिक व्हिडिओप्रकरणी भाजप युवा मोर्चाची निदर्शने

12:37 PM Dec 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
लैंगिक व्हिडिओप्रकरणी भाजप युवा मोर्चाची निदर्शने
Advertisement

आमदार कार्लोस फेरेरा यांच्या राजीनाम्याची मागणी : काँग्रेस भवनपर्यंत काढला मोर्चा

Advertisement

पणजी : लैंगिक व्हिडिओ प्रकरणी काल मंगळवारी भाजप युवा मोर्चाने पणजीतील काँग्रेसभवनसमोर निदर्शने केली. हळदोण्याचे काँग्रेस आमदार कार्लोस फेरेरा यांना आमदार पदावरून हटवण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. फेरेरा यांच्या विरोधात जोरदार घोषणबाजी करीत भाजप युवा मोर्चाने भाजप कार्यलयापासून ते काँग्रेस भवनपर्यंत हा मोर्चा काढला. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष समिर मांद्रेकर, हळदोणचे माजी आमदार ग्लेन टिकलो व अन्य भाजप युवा कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार कार्लोस फेरेरा यांनी केलेली ही लाजीरवाणी गोष्ट आहे. त्यांनी केलेल्या कृत्याचा आम्ही निषेध करीत असून त्यांनी त्वरित आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी समिर मांद्रेकर यांनी केली.

वर्षभर आमदार गप्प का?

Advertisement

आमदार म्हणतात की, व्हिडिओ मॉर्फ केला असून आपल्याला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र हे प्रकरण आज किंवा कालचे नसून याला एक वर्ष झाले आहे. इतके दिवस आमदार गप्प का राहिले असा प्रश्न मांद्रेकर यांनी उपस्थित केला. संशयिताने पैशांची मागणी केली असता सुऊवातीला आमदाराने पाच लाख ऊपये दिले आणि पाच कोटीची मागणी केली असता तक्रार दाखल केली असे का? कुणी दोषी असल्याशिवाय पैसे देईल का? असे प्रश्न मांद्रेकर यांनी उपस्थित केले.

अन्यथा महागात पडेल

काँग्रेस पक्षाला आपल्या आमदाराची काळी कृत्ये दिसत नाहीत. लोकांचे लक्ष वळविण्यासाठी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीवर खोटे आरोप करीत सुटले आहेत. कुणी विनाकारण किंवा पुरावे नसताना आरोप करू नये. आरोप करणाऱ्यांनी अगोदर पुरावे सादर करावे, अन्यथा महागात पडेल असा इशाराही मांद्रेकर यांनी यावेळी दिला. हळदोणचे आमदार हे लोक प्रतिनिधी असून त्यांच्याकडे लोकांनी आपली कामे घेऊन कसे जावे? त्यांची नजर आणि त्यांच्या वागणुकीबाबत लोकांच्या मनात संशय येणार नाही का? असा प्रश्न माजी आमदार ग्लेन टिकलो यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या आमदाराने त्वरित राजीनामा द्यावा किंवा त्यांच्या पक्षाने त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.